शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु, नदीकिनारी गावांना दक्षतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 22:06 IST

पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला असून ५ दरवाजे १ मीटरने उघडले आहेत.

ऑनलाइन लोकमतठाणे दि २१: पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला असून ५ दरवाजे १ मीटरने उघडले आहेत. भातसा धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सु.पा. सोनवणे यांनी यासंदर्भात शहापूर, भिवंडी, कल्याणच्या तहसीलदारांना सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत असे प्रांत अधिकारी डॉ संतोष थिटे यांनी सांगितले आहे. यामुळे शहापूर तालुक्यातील माहुली किल्ला व धबधबा, विहीगाव येथील अशोका किल्ला, भातसा व तानसाच्या ५०० मीटर परिसरात पर्यटकांना जाण्यापासून प्रतिबंध करण्यात आला आहे.  आज सकाळी ९ पासून भातसा धरणाची पातळी १३४.७६ मीटर एवढी झाली. धरणाची पाणी पातळी जलाशय प्रचालन सूचीनुसार नियमित ठेवण्यासाठी दरवाजे कोणत्याही क्षणी उघडावे लागणार असून परिणामत: भातसा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु होऊ शकतो.भातसा नदीच्या आसपासच्या गावांवर याचा परिणाम होऊ शकतो. शहापूर-किन्हवली रस्त्यावरील सापगाव पूल तसेच सापगाव व नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांनी दक्षता घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. वाहत्या पाण्यात प्रवेश करू नये तसेच अधिक काळजी घ्यावी असेही त्यांनी म्हटले आहे.शनिवार आणि रविवारची गर्दी लक्षात घेऊन हा प्रतिबंधात्मक आदेश बजावण्यात आला आहे. माहुली येथे काही दिवसांपूर्वीच २ युवकांचा धबधब्यात वाहून जाऊन मृत्यू झाला होता. धरणाचा पाणीसाठा वाढला की धरणाचे दरवाजे यांत्रिकरित्या आपोआप उघडले जातात परिणामत: धबधब्यांच्या ठिकाणी पाण्यात अचानक मोठी वाढ होऊन पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.या प्रतिबंधात्मक आदेशामुळे आता या परिसरांतील धबधब्यात पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पाण्यात उतरणे, ५०० मीटर परिसरात वाहने घेऊन जाण्यास बंदी राहील. पावसामुळे धोकादायक झालेल्या ठिकाणी किंवा कठड्यांवरून मोबाईलद्वारे सेल्फी काढणे, छायाचित्रे काढणे, चित्रीकरण करणे, याठिकाणी मद्यप्राशन करणे, मद्य बाळगणे यास पुढील आदेश होईस्तोवर बंदी आणण्यात आली आहे.