शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

राज्यातील धरणांत वॉटर स्पोर्ट्सचा थरार , बहरणार जलपर्यटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 06:52 IST

राज्यातील सह्याद्री आणि सातपुडा पर्वतराजीतील निसर्गपर्यटनस्थळे विकसित करून त्याला जोड म्हणून जलसंपदा विभागाच्या ३२५५ धरणांच्या परिसरात रिसॉर्ट, वॉटर स्पोर्ट्ससह नौकानयन, मनोरंजन पार्कचा आनंद पर्यटकांना आता लवकरच घेता येणार आहे.

- नारायण जाधवठाणे  -  राज्यातील सह्याद्री आणि सातपुडा पर्वतराजीतील निसर्गपर्यटनस्थळे विकसित करून त्याला जोड म्हणून जलसंपदा विभागाच्या ३२५५ धरणांच्या परिसरात रिसॉर्ट, वॉटर स्पोर्ट्ससह नौकानयन, मनोरंजन पार्कचा आनंद पर्यटकांना आता लवकरच घेता येणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने यास मंजुरी दिल्यानंतर जलसंपदा विभागाने यासाठीच्या खासगीकरणाचा आधार घेऊन पर्यटनवृद्धीस पोषक असे धोरण सोमवारीच जाहीर केले आहे.याचा सर्वाधिक लाभ समुद्रकिनाऱ्यांसह ठाणे आणि पालघरसह रायगड जिल्ह्याला होणार आहे. कारण, तिन्ही जिल्ह्यांत सह्याद्रीच्या रांगांतील पर्यटनस्थळे, बीचसोबतच जलसंपदा विभागाच्या मालकीची धरणे आहेत. यात काही एमआयडीसी आणि महापालिकांच्या धरणांचाही समावेश आहे. या सर्व ठिकाणी आता खासगीकरणातून जलपर्यटन वाढीस लागून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे जलसंपदा विभागाच्या पाच महामंडळांच्या अधिनियमातील तरतुदी या सारख्याच असल्याने हे राज्यस्तरीय एकत्रित धोरण तयार करण्यात आले आहे.जलसंपदा विभागाच्या या धोरणानुसार या पाचही महामंडळांकडे असलेल्या पर्यटनक्षम जमिनी, विश्रामगृहे, इमारती, वसाहती या खासगी भागीदारी किंवा बांधा, वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहेत.ही आहेत धोरणेजलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील पर्यटनस्थळांचा विकास करणे. त्यासाठी खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे. रिसॉर्ट, वॉटर स्पोर्ट्ससह नौकानयन, मनोरंजन पार्क विकसित करणे. कला व हस्तकला केंद्रांची उभारणी करणे. सह्याद्री रांगांमध्ये हिल स्टेशन विकसित करणे. रोप वे विकसित करणे. कॅम्पिंग कॅरावानिंग व तंबूची सोय, प्रदर्शन केंद्र, पर्यटनसुविधा पुरवणे, यासाठी महाराष्ट्र पर्यटन धोरण-२०१६ च्या तरतुदींचा अंगीकार करून त्या यासुद्धा धोरणास लागू करण्यात येणार आहेत.१० ते ३० वर्षांचा राहणार करारजलसंपदा विभागाच्या या धोरणानुसार अ वर्ग पर्यटनस्थळे ही दुरुस्त करून १० वर्षांच्या करारावर देण्यात येणार आहेत. हा करार संपल्यानंतर कंत्राटदारास अजिबात मुदतवाढ न देता नव्याने ई-निविदा मागवल्या जातील.. तर, ब व क वर्ग पर्यटनस्थळे विकासकास ३० वर्षांच्या करारावर देण्यात येतील. त्यांची दुरुस्ती व गुंतवणूक पूर्णत: विकासकाने करयाची आहेत. येथे तो नव्याने त्याच्या सोयीनुसार जलसंपदा विभागाची परवानगी घेऊन बांधकाम करून त्याचा वापर करू शकणार आहे. मात्र, ३० वर्षांचा करार संपल्यानंतर विकासकास मुदतवाढ देण्यात येणार नाही.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र