शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

उरणकरांवर नववर्षातच पाणी टंचाईचे संकट: २० ग्रामपंचायतींसह ६८ औद्योगिक क्षेत्रातील आठवड्यातुन तीन दिवस पाणी पुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 19:22 IST

दिघोडे बार्टर व्यवस्थेतून पाणी देण्यास सिडकोने नकार दिल्याने १ जानेवारीपासून आठवड्यातून तीन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय उरण एमआयडीसीने जाहीर केला आहे.

मधुकर ठाकूर

उरण :

दिघोडे बार्टर व्यवस्थेतून पाणी देण्यास सिडकोने नकार दिल्याने १ जानेवारीपासून आठवड्यातून तीन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय उरण एमआयडीसीने जाहीर केला आहे. यामुळे उरणकरांवर नववर्षाच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. उरण तालुक्यातील दिड लाख लोकसंख्या, २० ग्रामपंचायत हद्दीतील गावे,उरण नगरपरिषद, आणि परिसरातील औद्योगिक क्षेत्र मिळून एकूण ६८ ग्राहकांसाठी एकमेव असलेल्या रानसई धरणातुन एमआयडीसी मार्फत पाणी पुरवठा केला जात आहे.

वाढती लोकसंख्या आणि वाढत्या औद्योगिक विस्तारामुळे दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी १० एमएलडी इतक्या पाण्याची गरज भासते.रानसई धरणातील पाणी नागरिकांना पाऊस पडेपर्यंत पुरवठा करावा लागत असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून एमआयडीसीकडून सिडकोच्या हेटवणे पाणीपुरवठा योजनेतुन दररोज ५-६ एमएलडी पाणी घेतले जाते.शिवाय काही प्रमाणात गरजेनुसार पाणी कपात ही केली जाते.

यावर्षी मात्र सिडकोच्या हेटवणे पाणीपुरवठा योजनेतुन १ जानेवारीपासून दररोज ५-६ एमएलडी पाणी देण्यास नकार दिला आहे.सिडकोने घेतलेल्या असहकाराच्या भुमिकेमुळे एमआयडीसीची चांगलीच पंचाईत झाली आहे.पावसाळ्यापर्यत उरणकरांना पाणी पुरवठा कसा करायचा या विवंचनेत असलेल्या एमआयडीसीने अखेर तीन दिवस पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.आठवड्यातील मंगळवार, शुक्रवार आणि रविवार असा तीन दिवस पाणी पुरवठा रात्री १२ तासांसाठी खंडित करण्यात येणार आहे.तशा सुचनाही एमआयडीसीने ग्राहकांना दिल्या असल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता रविंद्र चौधरी यांनी दिली. मात्र सिडकोच्या असहकार्याच्या भुमिकेमुळे उरणकरांवर नववर्षाच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे.