शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

माणगावातील ६० गावांमध्ये पाणीटंचाई

By admin | Updated: May 4, 2017 06:13 IST

दरवर्षीप्रमाणे या वर्षी मार्च महिन्यापासून माणगाव तालुक्यातील १९ गावे व ४१ वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहचली आहे.

गिरीश गोरेगावकर / माणगावदरवर्षीप्रमाणे या वर्षी मार्च महिन्यापासून माणगाव तालुक्यातील १९ गावे व ४१ वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहचली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने विहिरी, बोअरवेलमधील पाण्याची पातळी खालावली आहे. किंबहुना पाणी नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शासनाच्या टँकरने होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या प्रतीक्षेत नागरिक आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी २७ गावे व ४६ वाड्या टँकरमुक्त झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे, परंतु चालू आराखड्यात केवळ १९.५० लाखांचीच तरतूद करण्यात आल्याने माणगाव तालुका टँकरमुक्त होऊन पाणीटंचाईची साडेसाती कायमची कधी संपणार याची प्रतीक्षा पाणी टंचाईग्रस्त नागरिक करीत आहेत.माणगाव तालुक्यातील ३९ गावे व ८२ वाड्यांना २०१६-१७ मध्ये पाणीटंचाई काळात पाणीटंचाई निवारण कृती आराखडा बनविण्यात आला होता. यासाठी ४६.१० लाखरु पयांची तरतूद करण्यात आली होती. ही सर्व गावे व वाड्या दुर्गम, उंच डोंगरावर आहेत. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने यावर्षी पाणीटंचाईची समस्या फार मोठ्या प्रमाणात जाणवत नाही ही तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत जमेची बाब आहे. मागील गाव, वाड्यांपैकी २७ गावे व ४६ वाड्यांचा यावर्षीच्या कृती आराखड्यात समावेश नाही. मात्र ३ गावे व ५ वाड्यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. पाणीटंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने सोय करून टंचाई काळात साधारणपणे अडीच ते तीन महिने पाणीपुरवठा केला जातो. यावर्षीदेखील पाणीटंचाई कृती आराखड्यात समावेश असलेली गावे आराखड्यातून घालविण्यासाठी कालवा अथवा पाणीस्रोत असलेल्या ठिकाणी पाणीयोजना उभारून पाणीटंचाई दूर करण्याची मागणी टंचाईग्रस्त नागरिक करीत आहेत. यावर्षी आतापर्यंत वडवली गौळवाडी, मालुस्ते, पळगाव खु. धनगरवाडी, पळसगाव बु. धनगर वाडी, हुंबरी धनगरवाडी या सहा गावे व वाड्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. या गावांमधील ग्रामस्थांना विशेषत: महिलांना डोक्यावर पाण्याचे तीन-चार हंडे आणून मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे हा पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी होत आहे.पाणीटंचाईग्रस्त  गावे आणि वाड्याकोस्ते खुर्द, फलाणी, करंबेळी, वाढवण, निळज, करंबेळी, पोटणेर, नगरोली, वनी मोहल्ला, काचले गाव, कुंभळमाच, हरवंडी गाव, बामणगाव, सिलीम, चाच, मालुस्ते, केळगण, कामतवाडी व जोर ही गावे तर करंबेळी धनगरवाडी, पोटणेर मराठी शाळेजवळ, नगरोली आ. वाडी, नगरोली बौद्धवाडी, खरवली आ. वाडी, साई खैरावाडी, भुवन आ. वाडी, नांदवी रोहिदासवाडी, मोरेची वाडी, वारक आ.वाडी, देगाव आ. वाडी १, देगाव आ. वाडी २, सोंडेमाळ आ. वाडी, कुमशेत खडकमाळ आ. वाडी, हरवंडी कोंड, बोंडीमाळ आ. वाडी, भागाड आ. वाडी, कोंडेथर, वजवली गौळवाडी, मशिदवाडी, मशिदवाडी बौद्धवाडी, कातळवाडी, उधळेकोंड, मळ्याची वाडी, निगुडमाळ, मांजरवणे वडाची वाडी, सांगी आ. वाडी, डोंगरोली गौळवाडी, विहुले कोंड, जांभूळमाळ, हरकोल कोंड आ. वाडी, हरकोल बौद्धवाडी, पळसगाव खु. आ. वाडी, पळसगाव बु. धनगरवाडी, हुंबरी धनगरवाडी, डोंगरोली बौद्धवाडी, कविलवहाळ धनगरवाडी, पळसगाव बु. धनगर वाडी, पळसगाव खु. धनगरवाडी, खरबाचीवाडी आ. वाडी या वाड्यांचा समावेश आहे.गतवर्षीची पाणीटंचाईमुक्त  गावे आणि वाड्यासुरव तर्फे निजामपूर, रेपोली फाटा नवीन वसाहत, रु द्रौली, इंदापूर गाव, इंदापूर साईनगर, निवी, कुंभार्ते, पेण तर्फे तळे, आमडोशी, न्हावे, खरवली, उमरोली, साईनगर परिसर, उंबर्डी, अबडुंगी, जांभूळमाळ, घोटेवाडी, माकटी, गंगेवाडी, वारक गाव, साले १, साले २, राजीवली गाव, उमरोली, वावेदिवाळी, साळवे ही गावे तर तळाशेत बौद्धवाडी, निवी आ. वाडी, जोर धनगरवाडी, सिलीम बौद्धवाडी, तळेगाव आ. वाडी (चापडी), पळसगाव खु. कातेवाडी, साई आ. वाडी बोरकस वाडी, निजामपूर नवेनगर, निजामपूर मोहल्ला, निजामपूर वांगणवाडी, तळाशेत शिक्षक कॉलनी, तळाशेत कलानगर, पोटणेर आ. वाडी, रु द्रौली आ. वाडी, वावेदिवाळी वडाची वाडी, वडाची वाडी आ. वाडी, कुंभेवाडी, केस्तुली बौद्धवाडी, चांदे आ. वाडी, कोशिंबळे आ. वाडी, महादपोली आ. वाडी. महादपोली (निगडा) आ. वाडी, गोवेले वणीवाडी, गोवेले गवळवाडी, गोवेले चिकणीवाडी, हरवंडी कोंड, फलाणी बौद्धवाडी, खरवली आ. वाडी. उमरोली बौद्धवाडी, कशेणे बौद्धवाडी, कशेणे आ. वाडी, हरवंडी चर्मकार वाडी, निजामपूर पी.एच.सी., कुंभार्ते आ. वाडी, माकटी आ. वाडी, नगरोली नामदेव नेमाणे घराजवळ, नगरोली नामदेव मंचेकर घराजवळ, रातवड बौद्धवाडी, धरणाची वाडी, उमरोली आ. वाडी, उमरोली बौद्धवाडी या वाड्या पाणीटंचाईमुक्त झाल्याचे मागील वर्षीच्या कृती आराखड्यातून तुलनात्मकदृष्ट्या स्पष्ट होत आहे.