शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यातील रहिवाशांना तो पुरवतोय पाणी

By admin | Updated: May 19, 2016 03:40 IST

सध्या ठाणे जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा अधिक प्रमाणात सोसाव्या लागत आहेत.

अजित मांडके,

ठाणे- सध्या ठाणे जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा अधिक प्रमाणात सोसाव्या लागत आहेत. ठाण्यापेक्षा कळवा, मुंब्रा आणि दिव्यातील रहिवाशांना अधिक फटका बसतो आहे. कपातीच्या काळात येथील रहिवाशांना पाणी मिळावे म्हणून दिव्यातील जलमित्र निलेश पाटील याने पुढाकार घेतला असून साबे गावात कोरड्या विहिरीत टँकरद्वारे पाणी टाकून सुमारे ३०० कुटुंबांना मोफत पाणी उपलब्ध करुन देण्याचे मोलाचे कार्य सुरु केले आहे. ठाणे शहराला आठवड्यातून दोन दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. तर कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात तीन दिवस पाणीकपात आहे. मात्र, त्यानंतरही पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे रहिवाशांना काटकसरीने पाणी वापरावे लागते. तर दिव्यातील अनेक भागांना आजही रेल्वे लाईन क्रॉस करुन पाणी आणावे लागते. विहिरीदेखील कोरड्या झाल्याने रहिवाशांचे हाल होतात. त्यामुळे पाण्याची बचत करण्याचा सल्ला निलेश पाटील हे देत आहेत. येथील गावांना पाणीकपातीच्या काळात पाणी उपलब्ध होत नसल्याने त्यांनी स्वखर्चातून महिनाभरापासून कोरड्या विहिरीत टँकरद्वारे पाणी टाकण्यास सुरुवात केली आहे. बुधवार आणि शुक्रवारी टँकरद्वारे पाणी विहिरीत टाकण्याचे काम ते करतात. आतापर्यंत सुमारे १ लाख लीटर पाणी त्यांनी रहिवाशांना उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे ते साबे गावाचे जलमित्रच ठरले आहेत. समाजसेवेचा हा वसा त्यांनी वडिलांकडून घेतला असून, तो आजही सुरुच ठेवला आहे.