शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर पाणीप्रश्न

By admin | Updated: April 4, 2017 03:29 IST

पनवेल महानगरपालिकेत सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून, राजकीय पक्षांकडून वातावरण निर्मिती करण्यात येत आहे.

अरुणकुमार मेहत्रे,

कळंबोली- पनवेल महानगरपालिकेत सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून, राजकीय पक्षांकडून वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. शहरातील काही भागात अल्पदाबाने, दिवसभरातून एकदाच तासभरासाठी पाणी येत असल्याने नागरिक हैराण आहेत. त्यामुळे शेकाप आघाडीने हाच प्रश्न अजेंड्यावर ठेवला आहे. ‘दिवसाआड पाणी... किती दिवस तीच कहाणी...’ अशी बॅनरबाजी शेतकरी कामगार पक्षाने सुरू केली असून अशा आशयाचे बॅनर्स शहरात, रेल्वेस्थानकात लावले आहेत. मनसे आणि शिवसेनेकडूनही पाण्याचेच भांडवल करण्यात येत आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीचा विचार करता, शहराला देहरंग धरणातून पाणीपुरवठा केला जातो. परंतु धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी असल्याने मागणीप्रमाणे पाणी मिळत नाही. त्यामुळे एमजेपी आणि एमआयडीसीकडून पाणी विकत घ्यावे लागते. मे महिन्यापर्यंत पिण्याचे पाणी मिळावे यासाठी काही भागात आतापासूनच पाणीकपात करण्यात आली आहे. त्यासाठी देहरंग धरणातून अतिशय कमी पाण्याचा उपसा करण्यात येत आहे, तर इतर प्राधिकरणाकडून येणारे पाणी दिवसाआड पनवेलकरांना पुरवले जात आहे. यामुळे पाणीटंचाई भासत असून गतवर्षीही हीच स्थिती होती. नवीन पनवेल, कळंबोली या वसाहतींना एमजेपीकडून मागणीप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. कामोठे नोडलाही नवी मुंबई महापालिकेकडून कमी पाणी दिले जाते. खारघरमधील परिस्थिती फारशी वेगळी नाही. समाविष्ट केलेल्या गावांचा प्रश्नच आणखीनच बिकट आहे. दरवर्षी भेडसावणाऱ्या पाणीसमस्येवर खरेतर सर्वपक्षांनी एकत्र येऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र राजकीय पक्षांकडून पाणीप्रश्नाचे भांडवल करण्यात येत आहे. रेल्वे स्थानक, चौकाचौकात, एनएमएमटी, रिक्षांवर सुध्दा स्टिकर लावले आहे. माजी नगराध्यक्ष संदीप पाटील आणि माजी नगरसेवक सुनील बहिरा यांनी प्रभाग क्र मांक १७ आणि २० मध्ये पाण्याचा मोफत टँकर सुरू केला आहे. त्या टँकरवर सुध्दा ‘दिवसाआड पाणी, किती दिवस तीच कहाणी’ असा बॅनर लावण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्र मांक १७ आणि १८ मधील उमेदवार अतुल चव्हाण आणि यतीन देशमुख यांच्याकडून किती वर्षे पाणीप्रश्न प्रलंबित, आता बदल हवा अशा आशयाचा संदेश सोशल मीडियात फिरत आहे.