शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पाणी जायकवाडीत जाणारच

By admin | Updated: November 4, 2015 02:47 IST

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील पाच धरणांमधून १२.८४ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयास स्थगिती

औरंगाबाद : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील पाच धरणांमधून १२.८४ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयास स्थगिती देण्यास उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानेही मंगळवारी नकार दिला. परिणामी, दोन दिवसांपूर्वी सोडलेले हे पाणी ठरल्याप्रमाणे जायकवाडीत पोहोचणार आहे.जायकवाडीसाठी पाणी सोडण्याविरुद्ध उच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला होता. याच्याविरोधात विरोधात बाळासाहेब घुमरे, संजीवनी (टाकळी) सहकारी साखर कारखाना, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखाना, गुरुप्रसाद कालवा स्तरीय पाणीपुरवठा व्यापार संस्था आणि हरिश्चंद्र पाणीपुरवठा संस्थांचे सहकारी फेडरेशन यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केल्या. मात्र, सरन्यायाधीश न्या. एच. एल. दत्तू व न्या. अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने कोणताही हस्तक्षेप करण्यास नकार देऊन त्या निकाली काढल्या.उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगितीसंबंधी सुनावणीसाठी १७ डिसेंबर ही तारीख दिली होती. त्याऐवजी एक महिना आधी म्हणजे १८ डिसेंबर रोजी सुनावणी घ्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने १७ आॅक्टोबर रोजी समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार जायकवाडी धरणामध्ये १२.८४ टीएमसी पाणी मुळा, प्रवरा, गंगापूर, गोदावरी-दारणा व पालखेड या धरण समूहातून सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवारपासून पाणी सोडणे सुरूही झाले आहे. वरच्या धरणांमधून सोडलेले हे पाणी जायकवाडीपर्यंत विनाअडथळा पोहोचेल व ते फक्त पिण्यासाठीच वापरले जाईल, याची खात्री करण्याचे आश्वासन राज्य सरकारने उच्च न्यायालयास आधीच दिलेले आहे. त्याचे पालन होईल, याकडे मुख्य सचिवांनी लक्ष द्यावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.जायकवाडीत पाणी सोडण्यास स्थगिती मागताना याचिकाकर्त्यांतर्फे कपिल सिब्बल व शेखर नाफडे या ज्येष्ठ वकिलांनी असा युक्तिवाद केला की, जायकवाडी उर्ध्व भागातील धरण समूहातून पाणी सोडल्यास नाशिक व नगर जिल्ह्यांना पिण्यासाठी पाणी राहणार नाही. या भागातील फळबागा उद्ध्वस्त होतील. जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यात २६ टीएमसी पाणी आहे व ४.५५ टीएमसी पाणी उपयुक्त साठ्यामध्ये शिल्लक असल्याने जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची गरज नाही.याचा प्रतिवाद करताना गोदावरी पाटबंधारे महामंडळातर्फे अ‍ॅड. सतीश तळेकर यांनी न्यायालयाच्या असे निदर्शनास आणले की, जायकवाडी धरणातील मृत साठ्यातील २६ टीएमसी पाणी हे पिण्यायोग्य नाही व मृतसाठा हा आपत्कालीन परिस्थितीसाठी वापर करावयाचा असतो. सद्यस्थितीला जायकवाडीत केवळ ४.५५ टीएमसी पिण्यायोग्य पाणी आहे. या उलट उर्ध्व भागातील धरणात ६२ टक्के पाणी पातळी तर जायकवाडी व त्याखालील धरण समूहात केवळ १४ टक्के पाणी पातळी आहे. नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांमध्ये ४५ टीएमसीपेक्षा जास्त पाण्याचा साठा आहे.मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे व त्यामुळे समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार १२.८४ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असेही अ‍ॅड. तळेकर यांनी सांगितले.या प्रकरणात मराठवाडा जनता विकास परिषदेचे परभणी येथील कार्यकर्ते प्रा. अभिजित धानोरकर यांनी अ‍ॅड. अमोल करांडे यांच्यामार्फत कॅव्हेट दाखल करून स्थगितीस विरोध केला. (प्रतिनिधी)आतातरी विरोेध थांबवावाउच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातदेखील स्थगिती नाकारलेली असल्यामुळे आतातरी नाशिक व नगरकरांनी पाणी अडविण्याचा नाद सोडून द्यावा, असे आवाहन मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी केले आहे.यापुढे असा विरोध झाला तर मराठवाडा संघटितरीत्या त्याला चोख उत्तर देईल. त्यासाठीच ७ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली आहे, असेही अ‍ॅड. देशमुख यांनी सांगितले. कठोर उपायांची हमीनाशिक व नगर जिल्ह्यांतील पाच धरणांमधून सोडलेले पाणी जायकवाडीपर्यंत नीट पोहोचेल याची खात्री करण्यासाठी कठोर उपाय योजण्याची हमी राज्य सरकारने दिली आहे. त्यानुसार सोडलेल्या पाण्याची गळती होऊ नये व ते वाटेत कोणालाही उपसता येऊ नये यासाठी मार्गातील कोल्हापूर टाईप बंधाऱ्यांचे दरवाजे बंद केले जातील व भागातील वीजपुरवठाही बंद ठेवला जाईल.‘मुळा’चे पाणी जायकवाडीत पोहोचलेमुळा धरणातील पाणी मंगळवारी रात्री उशिरा जायकवाडी धरणात पोहोचले. जायकवाडी धरणात ३ हजार १३१ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे, तर भंडारदरा धरणातील पाणी ८० किलोमीटरचे अंतर कापून प्रतापूरमध्ये दाखल झाले असून, प्रवरचे पाणी जायकवाडी धरणात पोहोचण्यास २ दिवसांचा कालावधी लागेल, असा अंदाज पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे़ भंडारदरा-निळवंडे धरणातून प्रवरा नदीत २ हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे़ रविवारी ९ वाजता सोडलेले पाणी अद्यापही जायकवाडीत पोहोचले नाही़ निळवंडेच्या पाण्याने ८० किलोमीटरचे अंतर कापले असून, पाणी प्रतापूरमध्ये दाखल झाले आहे़नवी याचिकाही फेटाळलीनाशिक पंचायत समितीचे सदस्य अनिल ढिकळे यांची नवी याचिकाही कोर्टाने फेटाळली. पिण्यासाठी व वापरासाठी किती पाणी याचा स्पष्ट उल्लेख नसल्याने आदेशाला स्थगिती द्यावी, अशी ढिकळे यांची विनंती होती. आधीच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला.भाजपा आमदारांच्या घरांसमोर निदर्शनेनाशिक : जायकवाडीसाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा मुद्दा पेटला असताना, स्थानिक भाजपा आमदार मात्र मौन बाळगून असल्याने त्यांना जागे करण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने शहरातील भाजपाच्या तिन्ही आमदारांच्या निवासस्थानी धडक दिली. आमदार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानासमोर घोषणाबाजी केली. सानप मात्र निवासस्थानी नव्हते. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या विदेश दौऱ्यावरून परतल्या नसल्याचे सांगण्यात आले. केवळ फोटोसेशन करून आंदोलनकर्ते आमदार सीमा हिरे यांच्या घराकडे गेले, परंतु सीमा हिरे आणि त्यांचे पती महेश हिरे हे स्वत:हून सामोरे गेले आणि आपण नाशिककरांसोबतच असल्याची ग्वाही दिली. त्यांच्या घरासमोर घंटा वाजल्याच नाहीत.