शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

‘टाटां’च्या धरणांतील पाण्याने दोन कोटी लोकांचा प्रश्न मिटेल

By admin | Updated: May 29, 2016 01:18 IST

पुणे जिल्ह्यातील टाटांच्या सहा धरणांतील पाण्यामुळे दुष्काळी भागातील दोन कोटी लोकांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. याशिवाय हे पाणी शेतीसाठी वापरले

सोलापूर : पुणे जिल्ह्यातील टाटांच्या सहा धरणांतील पाण्यामुळे दुष्काळी भागातील दोन कोटी लोकांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. याशिवाय हे पाणी शेतीसाठी वापरले तर ४ लाख एकर एवढे प्रचंड क्षेत्र अतिरिक्त सिंचनाखाली येईल. त्यामुळे सामाजिक दायित्वाच्या भावनेतून आपण यासाठी आवाज उठवत आहोत, असे युवा सामाजिक कार्यकर्ते व जलअभ्यासक प्रफुल्ल कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे असणारे कदम यांनी टाटा धरणांतील पाण्यात उतरून अभिनव जलसत्याग्रह केल्यानंतर त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष गेले. नुकतीच त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयात भेट देऊन आंदोलनामागची भूमिका सविस्तर विशद केली. उच्च न्यायालयाने पाणी ही समाजाची राष्ट्रीय संपत्ती असल्याचे स्पष्ट करताना ती टाटा अथवा कोणाची खासगी मालमत्ता नसल्याचे म्हटले आहे, याकडे लक्ष वेधले असता कदम म्हणाले की, पाण्याचे नैसर्गिक स्थान व जलकायदे यामध्ये ही बाब अंतर्भूत होतीच. परंतु उच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे ही बाब अधिक स्पष्ट झाली. टाटा कराराकडे राज्य सरकारने आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने या दृष्टीनेच पाहिले पाहिजे. माझा प्रस्ताव असा आहे की, टाटा या पाण्यातून जेवढी वीज निर्माण करते तेवढ्या विजेचा पर्याय टाटाला उपलब्ध करून द्यायचा जो सहज उपलब्ध आहे आणि टाटांच्या धरणातील सर्व पाणी कायमस्वरूपी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला पाइपलाइनद्वारे पिण्यासाठी तसेच गरजेनुरूप शेतीसाठी व अन्य उद्योगांसाठीही वापरायचे. (प्रतिनिधी )कदम यांच्या प्रमुख नऊ मागण्या- टाटाच्या मालकीच्या धरणातील पाणी दुष्काळी भागाला देण्याचा निर्णय तत्काळ घ्यावा.- टाटा करारपत्राची वैधता व योग्यता तपासण्यासाठी कायदेतज्ज्ञांची (जलतज्ज्ञांची नव्हे) व अनुभवी प्रशासकांची समिती नेमावी.- दुष्काळी भागाला टाटाचे पाणी उपलब्ध होण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधण्यासाठी अभ्यास गट नेमावा.- संभाव्य ५०० मेगावॅट अपारंपरिक ऊर्जानिर्मितीचा पर्यायी आराखडा तयार करण्यासाठी ऊर्जा विभागाला आदेश द्यावेत.- उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे योग्य व इष्टतम वापरासाठी आराखडा बनविण्यासाठी पाणीपुरवठा व जलसंपदा विभागाला संयुक्तपणे आदेश द्यावेत.- अवजल पाण्याचा लाभ होणाऱ्या भागासाठी पर्यायी नियोजनासाठी जलसंपदा विभागाला आदेश द्यावेत.- टाटा पॉवर कंपनीचेही नुकसान होणार नाही या दृष्टीने चर्चा करण्यासाठी कुशल अभ्यासगट नेमावा.- कृष्णा खोरे महामंडळाच्या जलआराखड्यामध्ये सदर मागणी प्रस्तावाचा तत्काळ समावेश करावा आणि या सर्व विषयाचे सनियंत्रण, समन्वय व अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कृती समिती नेमावी.