शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

९-१०वीच्या विद्यार्थ्यांना जलसंवर्धनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 05:40 IST

यंदापासून अनिवार्य; पुस्तकांसाठी बालभारतीकडून समिती

- श्रीकिशन काळे पुणे : ‘जल है तो कल है’ या घोषवाक्याप्रमाणे आता विद्यार्थ्यांमध्ये पाण्याचे महत्त्व रुजावे, म्हणून येत्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून नववी आणि दहावीसाठी जलसुरक्षा विषय अनिवार्य करण्याचा निर्णय झाला आहे. दहा भाषांमध्ये हा विषय शिकविला जाणार असून, जूनपूर्वी पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.२०२०-२१ पासून शालेय शिक्षणात नववी-दहावीसाठी ‘जलसुरक्षा’ या विषयाचा अंतर्भाव केला आहे. या विषयाचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी बालभारतीने एक तज्ज्ञांची समिती तयार केली असून, तिच्या कामाची सुरुवात नुकतीच पुण्यात झाली. या समितीमध्ये झीरो पेन्डसी राबविणारे माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, भूगर्भजलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर, जलतज्ज्ञ उपेंद्र धोंडे, जलसंवाद चळवळ चालविणारे दत्ता देशकर यांच्यासह काही तज्ज्ञांचा सहभाग आहे.पुस्तक लिहिणाऱ्या समितीतील सदस्य उपेंद्र धोंडे म्हणाले, ‘पहिल्या बैठकीत पुस्तकात कोणते विषय, प्रकरण असणार यावर अंतिम निर्णय झाला. यासाठी दोन समित्या आहेत. एक सल्लागर समिती आणि दुसरी कोअर कमिटी आहे. सल्लागार समितीमध्ये जलतज्ज्ञ, जल चळवळीतील कार्यकर्ते, लेखक आदी २७-२८ जणांचा समावेश आहे. दुसºया समितीत प्रत्यक्ष लिहिणारे लेखक आहेत. अभ्यासक्रमात सोप्या पद्धतीने जलसुरक्षा विषय असणार आहे. या विषयाला गुण नसतील, तर ग्रेड असतील. जलचक्र, जलविज्ञान, जलप्रदूषण, जल गुणवत्ता आदी प्रकरणांचा समावेश आहे.’सध्या पाणी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना हा विषय अनिवार्य असेल. अभ्यासक्रमासाठी समिती नेमली आहे. जून, २०२०पासून पुस्तके उपलब्ध होतील. इतरांना तसेच या क्षेत्रातील व्यक्तींना ही पुस्तके संदर्भ म्हणून वापरता येतील.- राजीवकुमार पाटोळे, समन्वय अधिकारी, बालभारती