शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
4
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
5
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
6
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
7
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
8
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
9
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
10
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
11
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
12
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
13
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
14
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
15
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
16
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
17
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
18
Nana Patekar : नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
19
'झिरो फिगर'च्या होण्यासाठी केलं खतरनाक डाएटिंग! तरुणी मरता मरता वाचली; भयानकच अनुभव..
20
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर

कुंभमेळ्यात ‘वॉण्टेड’ गुन्हेगारांवर ‘वॉच’

By admin | Updated: September 6, 2015 00:46 IST

खून, दरोडा, चोरी, दहशतवादी कारवाई तसेच विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत असताना तुरुंगातून फरार झालेले, पॅरोलवर सुटल्यानंतर परागंदा झालेले गुन्हेगार ओळख लपविण्यासाठी साधूंची

- विजय मोरे,  नाशिकखून, दरोडा, चोरी, दहशतवादी कारवाई तसेच विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत असताना तुरुंगातून फरार झालेले, पॅरोलवर सुटल्यानंतर परागंदा झालेले गुन्हेगार ओळख लपविण्यासाठी साधूंची वेषभूषा करीत असल्याचे अनेकदा समोर आले आहे़ त्यादृष्टीने नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात ‘वॉण्टेड’ गुन्हेगारांना शोधण्यासाठी राज्याच्या गुन्हे शोध पथकाचे (डिटेक्शन आॅफ क्राइम ब्रँच - डीबी) कर्मचारी येथे दाखल होणार असून, त्यांचा गुन्हेगारांवर ‘वॉच’ असणार आहे़कुंभमेळ्यात दहशतवादी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ तसेच पर्वणीच्या संधीचे सोने करण्यासाठी स्थानिक चोरट्यांसह परप्रांतातील भामटेही पर्वणी साधतात. तपोवनात कारच्या काचा फोडून लाखो रुपयांची रोकड चोरीस गेल्याची घटना तसेच महिलेची पर्स पळविल्याप्रकरणी परप्रांतीय महिलेसह तिच्या लहान मुलांना अटक करण्यात आली. मागील सिंहस्थात कुटुंबीयांचा खून करून फरार झालेला गुन्हेगार पोलिसांना साधूच्या वेषात आढळला होता. राज्यातील दहा पोलीस आयुक्तालयांतील प्रत्येकी चार व जिल्हा पोलीस दलातील प्रत्येकी दोन असे ११० कर्मचारी गुप्त पद्धतीने फरार गुन्हेगारांचा कुंभमेळ्यात शोध घेणार आहेत़, असे शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले.फरारी कैदी साधूच्या वेशात़़़नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी माधोसिंग ऊर्फ मंगलसिंग भोसले (३३, जामगाव, ता़ गंगापूर, जि़ औरंगाबाद) हा ६ एप्रिल २०१४ रोजी पळून गेला होता़ साधूचा वेश परिधान करून तो दिल्ली, हरिद्वाऱ, काशी या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी वास्तव्यास होता़ त्यानंतर तो नाशिकच्या सिंहस्थातही येणार होता़. मात्र तत्पूर्वीच कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलेल्या माधोसिंगला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली़सिंहस्थातही फरारी गुन्हेगार येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे विविध जिल्ह्यांमधील गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना नाशिकमध्ये पाठविण्याबाबत पोलीस महासंचालकांना पत्र पाठविले आहे़ बीडचे दोन कर्मचारी आले आहेत़ - सचिन गोरे, सहायक पोलीस आयुक्त, नाशिक