शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजप कार्यकर्त्यांवर थेट ‘सीएम’चा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 06:07 IST

मोबाइल अ‍ॅपचा वापर; अपलोड करावी लागते रोजच्या प्रचाराची माहिती

- लक्ष्मण मोरे पुणे : लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून, सर्वच पक्षांनी मतदारांच्या गाठीभेटी, प्रचार सभा, कोपरा सभांवर भर द्यायला सुरुवात केली आहे. प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर सुरू आहे. केंद्रातील सत्तेसाठी महाराष्ट्रातून अधिकाधिक जागा मिळणे महत्वाचे असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारावर नजर ठेवली असून, मुंंबईतील त्यांच्या वॉररूममधून कार्यकर्त्यांवर ‘वॉच’ ठेवला जात आहे.

बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख आणि मंडल प्रमुखांना मोबाइल अ‍ॅप देण्यात आले असून रोजच्या प्रचाराची माहिती कार्यकर्त्यांना त्यावर अपलोड करावी लागते आहे. तिची खातरजमा करण्यासाठी फडणवीसांच्या मुंबई कार्यालयातून कार्यकर्त्यांना थेट फोन करून तपशील विचरला जात आहे.भाजपने गेल्यावेळेप्रमाणेच सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू ठेवला आहे. पक्षाने पन्ना प्रमुख, बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख, मंडल प्रमुख अशी कार्यकर्त्यांची वर्गवारी केली आहे. तीन- चार बुथ प्रमुखांमागे एक शक्ती प्रमुख आहे. तीन-चार शक्ती प्रमुखांमागे मंडल प्रमुख आहे. या मंडल प्रमुखांचे ‘रिपोर्टिंग’ स्थानिक आमदारांकडे आहे. पन्ना प्रमुखांपासून केंद्रीय पातळीवरील कार्यकर्त्यांच्या कामाचे नियोजन ठरले आहे.

कार्यकर्त्यांचे काम झाले, की माहिती अपलोड करावी लागते. ती खरी किंवा खोटी याची खातरजमा वरिष्ठ पातळीवरून केली जाते. आलटून-पालटून कार्यकर्त्यांना कामाचा तपशील विचारणारे फोन मुंबईतून येत असून, त्यांच्याकडून माहितीची खातरजमा केली जाते.पक्षाने या कार्यकर्त्यांसाठी खास मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे. पक्षाच्या आदेशानुसार केलेली कामे, प्रचारविषयक कामे, तसेच पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण केल्यानंतर त्याचे छायाचित्र आणि माहिती या अ‍ॅपवर नियमित अपलोड करावी लागते.अ‍ॅप डाउनलोड करताना कार्यकर्त्यांचे नाव, मोबाइल क्रमांक, जबाबदारी याची सर्व माहिती दिलेली असल्याने वरिष्ठ पातळीवरून थेट कार्यकर्त्यांशी संपर्क साधणे सोपे होते.

टॅग्स :BJPभाजपा