शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

ऊर्जा प्रकल्पांत वापरणार प्रक्रिया केलेले सांडपाणी

By admin | Updated: April 12, 2017 22:56 IST

राज्यातील सर्व विद्युत ऊर्जा प्रकल्पांमध्ये प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक होणार आहे. राज्यातील पाण्याचा अपव्यय टळावा व सांडपाण्याचा योग्य वापर व्हावा

ऊर्जामंत्र्यांची माहिती : राज्यात सर्व ठिकाणी करणार बंधनकारकनागपूर : राज्यातील सर्व विद्युत ऊर्जा प्रकल्पांमध्ये प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक होणार आहे. राज्यातील पाण्याचा अपव्यय टळावा व सांडपाण्याचा योग्य वापर व्हावा यासाठी राज्य शासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे दिली. ह्यनीरीह्ण येथे आयोजित ह्यविकसनशील देशांतील एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रणालीह्ण या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान ते बोलत होते.ऊर्जा प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. विशेषत: औष्णिक ऊर्जा प्रकल्पांत तर जास्त पाणी लागते. शेतीसाठी पुरविले जाणारे पाणी येथे जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. मात्र दुसरीकडे शहरांमध्ये लाखो लिटर सांडपाणी वाहून जाताना दिसून येते. या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा उपयोग ऊर्जा प्रकल्पांमध्ये होऊ शकतो, असे बावनकुळे यांनी सांगितले.पाण्याच्या कमतरतेचचा फटका राज्यातील अनेक ऊर्जा प्रकल्पांना बसला आहे. मात्र सांडपाणी वापरण्यात आले तर या प्रकल्पांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा होऊ शकेल; शिवाय सांडपाण्याचा प्रश्नदेखील दूर होईल. परळी येथे नांदेडहून सांडपाणी पोहोचविणे शक्य आहे. याचप्रकारे इतर प्रकल्पांतदेखील जवळच्या शहरांतून सांडपाणी पोहोचविले जाऊ शकते, असे त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी कोराडी विद्युत प्रकल्पाचे उदाहरण दिले. कोराडी प्रकल्पात नागपूरच्या सांडपाण्याचा वापर करण्यात आला आहे. शिवाय जे सांडपाणी अगोदर वाया जात होते, त्यापासूनच आता नागपूर महापालिकेला १६ कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.