शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
3
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
4
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
5
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
6
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
7
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
8
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
9
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
10
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
11
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
12
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
13
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
14
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
15
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
16
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
17
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
18
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
19
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
20
'या' कंपनीचा शेअर २३९० वरून ५९ रुपयांवर घसरला; सेबीने केलेली कारवाई, आता नवी माहिती समोर

निवडीतच हेराफेरी!

By admin | Updated: December 12, 2015 02:52 IST

स्मार्ट सिटीच्या नावाखाली राज्य सरकारने केंद्राच्या निकषांत बदल करून १०० पैकी सर्वाेच्च गुण मिळालेल्या शहरांना डावलण्यात आले असून, कमी गुण मिळालेल्या शहरांची निवड केली गेली

नागपूर : स्मार्ट सिटीच्या नावाखाली राज्य सरकारने केंद्राच्या निकषांत बदल करून १०० पैकी सर्वाेच्च गुण मिळालेल्या उल्हासनगर, नांदेड आणि पिंपरी-चिंचवड या शहरांना डावलण्यात आले असून, कमी गुण मिळालेल्या शहरांची निवड केली गेली. केंद्रानेदेखील देशातल्या प्रमुख पाच राज्यांच्या राजधान्यांना स्मार्ट सिटी योजनेतून वगळले आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.गुण कमी-जास्त करण्याचा अधिकार राज्य सरकारला असल्याचे कोठेही नमूद नसताना, राज्य सरकारने हे गुण १०० ऐवजी ६० केले. राज्याचे ४० गुण वेगळे ठरवले गेले आणि राज्याला ज्या शहरांची निवड करायची होती त्यांचा त्यात समावेश करता यावा, यासाठी या ४० गुणांचा वापर करून घेतला गेला. राज्य सरकारने एकतर केंद्राची फसवणूक केली असून, हे सगळे ढोंग आहे असेही चव्हाण म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)पिंपरी-चिंचवडला वगळण्यामागे देखील गौडबंगाल असल्याचा संशय व्यक्त करीत चव्हाण म्हणाले, सुरुवातीला पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांचे गुण वेगवेगळे दिले गेले. ३० जुलैला झालेल्या बैठकीत केंद्राकडे प्रस्ताव पाठवताना दोन्ही शहरांचा एकत्रित प्रस्ताव पाठवला गेला. त्यानंतर पुन्हा एकदा पुणे शहराची स्वतंत्र प्रवेशिका पाठवण्यात आली. म्हणजेच राज्य सरकारने १० ऐवजी ११ शहरांच्या प्रवेशिका केंद्राला पाठवल्या. यातही १० प्रवेशिकांवर नगरविकास विभागाच्या सचिवांची सही आणि तारीख आहे.नगरविकास विभागाचा खुलासा स्मार्ट सिटी निवडीची संपूर्ण प्रक्रिया केंद्र शासनाचे निकष व मंत्रिमंडळाच्या पूर्वमान्यतेने संपूर्णपणे पारदर्शीपणे केली आहे. -वृत्त/७> लोकसंख्येचे निकष डावललेदेशातील प्रमुख तीन राज्यांत महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या ५ कोटी ८ लक्ष, उत्तर प्रदेशची ४ कोटी ४५ लक्ष आणि तामिळनाडूची ३ कोटी ५० लक्ष आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या १३ शहरांची निवड होणे अपेक्षित होत; पण प्रत्यक्षात १० शहरांची निवड केली गेली. त्याउलट उत्तर प्रदेशातल्या १३ आणि तामिळनाडूतल्या १२ शहरांची निवड केली. हे करताना शाब्दिक फेरफार करून महाराष्ट्रातील शहरांची संख्या कमी केल्याचा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला. अंतिम गुण तपासले असता कल्याण-डोंबिवलीचा क्रमांक १२ वा होता. मुंबईचा १४ वा आणि औरंगाबादचा १७ वा क्रमांक असताना या शहरांना पहिल्या १० मध्ये स्थान दिले गेले आणि उल्हासनगरचा चौथा, नांदेड वाघाळाचा ७वा आणि पिंपरी-चिंचवडचा १०वा क्रमांक असताना या शहरांना मुद्दाम डावलण्यात आल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला.