शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा परिषद : काँग्रेस-राकाँ तीन तर एका जागेवर सेना विजयी

By admin | Updated: July 8, 2016 18:11 IST

वाशिम जिल्हा परिषद विषय समितीच्या निवडणुकीत काँग्रेस व राकाँच्या प्रत्येकी दोन सदस्यांनी बंडखोरी केल्याने एका जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय सुकर झाला

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. ८ : वाशिम जिल्हा परिषद विषय समितीच्या निवडणुकीत काँग्रेस व राकाँच्या प्रत्येकी दोन सदस्यांनी बंडखोरी केल्याने एका जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय सुकर झाला. उर्वरीत तीन जागेवर काँग्रेसचे दोन तर राकाँच्या एका उमेदवाराचा विजय झाला. सभापतींचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १२ जुलै रोजी संपुष्टात येत असल्याने ८ जुलै रोजी ही निवडणूक घेण्यात आली.जिल्हा परिषदेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १७, शिवसेना १०, राष्ट्रवादी काँग्रेस आठ, भाजपा व अपक्ष प्रत्येकी सहा, भारिप-बमसं तीन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक असे पक्षीय बलाबल आहे. अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीने अपक्षांच्या मदतीने जिल्हा परिषदेची सत्ता मिळविली होती. २९ जून रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने अध्यक्ष तर राकाँने उपाध्यक्ष पद काबीज केले होते.

यामुळे चार विषय समितीच्या सभापतीपदाची निवडणूक काँग्रेस-राकाँ-अपक्ष व भारिप-बमसंची आघाडी सहज जिंकेल, असा अंदाज वर्तविला जात होते. प्रत्यक्ष मतदानाला सुरूवात झाल्यानंतर मात्र सभागृहात काँग्रेसच्याच काही सदस्यांनी वेगळेच ह्यराजकारणह्ण शिजविले. दुपारी ३ वाजता हात उंचावून मतदानाला सुरूवात झाली. प्रथम समाजकल्याण समिती सभापती पदासाठी मतदान झाले असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पानुताई दिलीप जाधव यांनी भाजपाच्या रत्नप्रभा घुगे यांचा सात मताने पराभव केला.

जाधव यांना २९ तर घुगे यांना २२ मते मिळाली. महिला व बालकल्याण विषय समिती सभापतीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या यमुनाबाई सिताराम जाधव यांनी शिवसेनेच्या रेखा सुरेश मापारी यांचा दोन मताने पराभव केला. जाधव यांना २७ तर मापारी यांना २४ मते मिळाली. दोन विषय समितीच्या सभापतीसाठी काँग्रेसचे सुधीर गोळे व राजेश जाधव, शिवसेनेचे विश्वनाथ सानप आणि राकाँचे देवेंद्र ताथोड निवडणूक रिंगणात होते. सर्वाधिक २७ मते घेऊन सुधीर गोळे विजयी झाले. दुसऱ्या पदासाठी काँग्रेसच्या दोन सदस्यांनी सेनेच्या उमेदवाराला मतदान केल्याने आणि काँग्रेसच्या एका सदस्याचे मतदान अवैध ठरल्याने शिवसेनेचे विश्वनाथ सानप एका मताने विजयी झाले.

सानप यांना २५ तर राजेश जाधव यांना २४ व देवेंद्र ताथोड यांना २३ मते मिळाली. या निवडणुकीत काँग्रेसचे विकास गवळी व सुखदेव मोरे या दोन सदस्यांनी सेनेचे विश्वनाथ सानप यांना मतदान केले तर काँग्रेसच्या ज्योती गणेशपूरे यांनी तीन उमेदवारांना मतदान केल्याने त्यांचे मत अवैध ठरविण्यात आले. यामुळे सेनेच्या उमेदवाराचा विजय सुकर झाला. राकाँचे देवेंद्र ताथोड व मिना भोने हे दोन सदस्य सेना-भाजपा युतीसोबत गेल्याचा फटकाही काँग्रेस-राकाँ युतीला बसला.