शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिकांना डावलून परराज्यातील मच्छिमारांना झुकते माप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 14:01 IST

प्रकल्पात मत्स्य उत्पादन करून मासेमारी करण्यासाठी लिलाव प्रक्रियेद्वारे कंत्राट देण्यात येते.

इंझोरी: जिल्ह्यात मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या अडाण प्रकल्पात संबंधित कंत्राटदार नियम डावलून परराज्यातील मच्छिमारांकडून मासेमारी करून घेत आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली असून यासंदर्भात त्यांनी मत्स्यव्यवसाय विभागाच्या प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार करून न्याय देण्याची मागणी केली आहे. 

वाशिम जिल्ह्यात मध्यम प्रकल्पांपैकी महत्त्वपूर्ण म्हणून मानोरा तालुक्यातील अडाण प्रकल्प ओळखला जातो. या प्रकल्पातील माशांना मोठी मागणी आहे. सदर प्रकल्पात मत्स्य उत्पादन करून मासेमारी करण्यासाठी लिलाव प्रक्रियेद्वारे कंत्राट देण्यात येते. यासाठी लाखो रूपयांची बोलीही लागते. या प्रकल्पावर ३०० हून अधिक स्थानिक मच्छिमारांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.  अडाण प्रकल्पाचे कंत्राट घेणाऱ्याला मासेमारीसाठी स्थानिक मच्छिमारांनाच प्राधान्य द्यावे लागते. कंत्राटाच्या करारनाम्यावरच ही तरतूद नमूद आहे. परंतु यंदा या प्रकल्पाचे कंत्राट घेणाऱ्या कारंजा येथील सहकारी संस्था हा नियम डावलून परराज्यामधील मच्छिमारांकडून अडाण प्रकल्पात मासेगामारी करून घेत आहे. त्यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या ३०० पेक्षा अधिक मच्छिमारांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. या मच्छिमारांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन राज्याबाहेरील मच्छिमारांकडून होत असलेली मासेमारी बंद करण्याची मागणीही केली. परंतु त्यांनी त्या मागणीची दखल घेतली नाही. त्यामुळे हताश झालेल्या स्थानिक मच्छिमारांनी न्यायासाठी थेट मत्स्यव्यवसाय विभाग वाशिमच्या सहाय्यक आयुक्तांसह प्रादेशिक उपायुक्त, पालकमंत्री,आमदार यांच्याकडे तक्रार केली आहे. 

टॅग्स :fishermanमच्छीमारjobनोकरी