शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
2
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
3
धक्कादायक! ३ लाखाचा प्लॉट ३० लाखाचा झाला; जावयाने पैसे मागितले, पत्नी-सासूने मिळून गेम केला
4
तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप
5
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
6
ओला, चेतक, TVS, एथर आणि व्हिडापैकी कोण आहे सरस? पाहा किंमत, रेंज आणि टॉप स्पीड
7
सचिन तेंडुलकरकडे आहे का तो स्मॉलकॅप स्टॉक ज्यानं वर्षभरात दिला १३,०००% पेक्षा जास्त रिटर्न, कंपनीनं काय म्हटलं?
8
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
9
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
10
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
11
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
12
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
13
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
14
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
15
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
16
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
17
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
18
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
19
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
20
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर

प्रत्युषा गर्भवती होती?

By admin | Updated: April 4, 2016 08:27 IST

‘बालिका वधू’फेम प्रत्युषा बॅनर्जी ही गर्भवती असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून तिची आत्महत्या व गरोदरपणाचा काही संबंध आहे का? या दिशेने पोलीस तपास करत आहेत.

मुंबई : ‘बालिका वधू’फेम प्रत्युषा बॅनर्जी ही गर्भवती असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून तिची आत्महत्या व गरोदरपणाचा काही संबंध आहे का? या दिशेने पोलीस तपास करत आहेत. प्रत्युषाचा प्रियकर राहुलला आठ तासांच्या चौकशीनंतर घरी सोडण्यात आले. त्याच्यासह आतापर्यंत तब्बल १० जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. शवविच्छेदनातील तपासणीत गरोदरपणाच्या सुरुवातीच्या स्थितीची माहिती मिळते. प्रत्युषा दोन महिन्यांची गरोदर होती, असे सांगितले जात आहे. या संदर्भातील काही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. प्रत्युषाची मैत्रीण आणि अभिनेत्री सारा खान हिने, राहुल राज तिला त्रास द्यायचा. त्यामुळे तिने या आधीही दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असा दावा केला आहे. मुंबई पोलिसांनी रविवारी प्रत्युषाचे घर सील केले. प्रत्युषाचे शेजारी अनुज सचदेवा यांनी सांगितले की, घटनेच्या दिवशी त्यांनी तिला रडताना पाहिले होते. ती राहुलवर विश्वासघाताचा आरोप करत होती. सध्या तरी हे प्रकरण आत्महत्येचेच दिसते. तिच्या आई-वडिलांनी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही, पण तपास सुरू आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी सांगितले. चौकशीत राहुल राज सिंह रडत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यात ‘प्रत्युषा बेबी व्हाय यू लेफ्ट मी.. आय अ‍ॅम कमिंग टू यू... मैं हमेशा तुम्हारे साथ था...’ अशा प्रकारे सतत तो बोलत होता. त्यात दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याची तब्येत बिघडल्याने, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रत्युषाला तिच्या आई-वडिलांकडून पैशांसाठी त्रास होत असल्याचा आरोप राहुलचे वडील राज सिंह यांनी केला आहे. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. ती आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने राहुल तिला पैशांसाठी मदत करत होता. त्याने वेळोवेळी तिच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. ती आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे सिंह यांचे म्हणणे आहे. मात्र, अभिनेता विकास पंजाबी यांनी हा आरोप फेटाळून लावला. प्रत्युषा प्रसिद्ध कलाकार होती, त्यामुळे तिच्याकडे पैशांची कमतरता नव्हती, असे त्यांचे म्हणणे आहे. अशी समस्या असती, तर राहुलविरोधात तिने तक्रार केली असती, असे अभिनेत्री फाल्गुनी भ्रमपुत्रा हिचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)अभिनेत्री राखी सावंतने खुलासा केला की, ‘प्रत्युषाने महिनाभरापूर्वीच एक कोटींचा विमा उतरवला होता. तिला तिच्या आई-वडिलांना विम्याचे वारस करायचे होते, पण राहुल बळजबरीने वारसदार बनला.’ याचाही अधिक तपास सुरू असल्याचे बांगुरनगर पोलिसांनी सांगितले.