मुंबई : दिवंगत सुपरस्टार अभिनेता राजेश खन्ना यांचे मृत्यूपत्र व ते प्रमाणीत करण्यासाठी न्यायालयात दाखल करण्यात आलेली कागदपत्रे अनिता अडवाणी यांना द्यावीत, या न्या़ आऱ डी़ धानुका यांच्या आदेशाविरोधात राजेश खन्ना यांची अभिनेत्री कन्या टिष्ट्वंकल खन्ना हिने मुख्य न्यायाधीश न्या. मोहित शहा व न्या़ एम़ एस़ सोनक यांच्या खंडपीठासमोर अपील दाखल केले आहे.न्या़ धानुका यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने हे आदेश ३० जुलैला दिले होते़ त्याविरुद्ध टिष्ट्वंकल हिने हेअपील केले असून त्यावर ५ आॅगस्टला सुनावणी होणार आहे़मुळात अडवाणी यांचा दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांच्याशी काहीही संबंध नाही़ त्यामुळे त्यांच्या मृत्यूपत्राची प्रत अडवाणी यांना देणे योग्य नाही, असा दावा अभिनेत्री टिष्ट्वंकल हिने अपील याचिकेत केला आहे़ मात्र राजेश खन्ना यांच्या मृत्यूआधी आपणच त्यांच्यासोबत होतो़ तेव्हा त्यांच्या मालमत्तेवर आपलाही अधिकार असून त्यांचे मृत्यूपत्र व ते प्रमाणीत करण्यासाठी दाखल झालेली कागदपत्रे आपल्यालाही द्यावीत, असे अडवाणी यांचे म्हणणे आहे़ (प्रतिनिधी)
मृत्युपत्र अडवाणींना देता येणार नाही
By admin | Updated: August 2, 2014 03:25 IST