शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वारी निर्बंधमुक्त, मास्क सक्तीचा निर्णय नाही - राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 07:07 IST

Rajesh Tope : हा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढला असून पॉझिटिव्हिटी रेट चिंताजनक असल्याचेही मंत्री टोपे यांनी सांगितले. दरम्यान, अद्याप मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

मुंबई : कोरोनाचे संकट असले तरी आवश्यक खबरदारी घेऊन यंदा वारी होईल, यात कोणतीच अडचण येणार नाही. योग्य ती काळजी घेऊन दिंडी पूर्ण करावी असा तत्त्वत: निर्णय झाल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली. सहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढला असून पॉझिटिव्हिटी रेट चिंताजनक असल्याचेही मंत्री टोपे यांनी सांगितले. दरम्यान, अद्याप मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर चर्चा झाली. यावेळी आरोग्य विभागाकडून कोविड संदर्भातील सादरीकरणही झाले. या बैठकीनंतर आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, रायगड, पालघर या सहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढला आहे.

काही ठिकाणचा पॉझिटिव्हिटी रेट ५ ते ८ टक्क्यांपर्यंत गेला आहे. ही आकडेवारी काळजी वाढवणारी आहे. या सर्व जिल्ह्यांमधील चाचण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही जिल्ह्यांमध्ये दर १०० चाचण्यांमागे ६ ते ८ टक्के पॉझिटिव्ह येत असले तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण चार टक्के आहे. यामध्ये गंभीर रुग्णांची संख्या नाही. त्यामुळे काळजीचे कारण नाही. पण या सहा जिल्ह्यांत कोरोना चाचण्या कठोरपणे वाढवण्याच्या सूचना केंद्र सरकारनेही दिल्या असे मंत्री टोपे यांनी सांगितले. 

राज्यात मास्कसक्तीचा निर्णय झालेला नाही. पण लोकांनी स्वत:हून मास्क घालावे. लोकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी मास्क घालावा. मास्क घातला नाही म्हणून कारवाई होणार नाही. दंड आकारला जाणार नाही. तसेच लसीचे दोन डोस घेतलेल्यांनी बूस्टर डोस घ्यावेत. दुसऱ्या डोसनंतर नऊ महिने झाले असतील तर बूस्टर डोस घ्यायला हवा, असे टोपे म्हणाले. 

आषाढी वारीची तयारी पुढे गेलीपुढील महिन्यातील आषाढी वारीबाबत टोपे म्हणाले की, आता वारीची तयारी पुढे गेली आहे. यंदाची वारी होईल त्यात अडचण येणार नाही. वारीत लाखो वारकरी एकत्र येतात, त्यामुळे काळजी घेऊन वारी पूर्ण करावी लागेल, अशी चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली.

     कोरोनाचा नवा व्हेरिएंट अधिक संक्रामक असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे.      चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झालेल्या अनेक सेलिब्रिटींना लागण झाली आहे. या मंडळींना बीए ४ व बीए ५ या व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे. तर, राजकीय क्षेत्रातील नेतेही कोरोना पाॅझिटिव्ह होत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत.      सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही ताप येत आहे. त्यांच्या चाचणीचा अहवाल अद्याप आला नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस