शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Wardha: गॅस सिलिंडरच्या भावात घट निवडणूक गिफ्ट नाहीच, तर..., प्रफुल्ल पटेल यांचा दावा

By महेश सायखेडे | Updated: September 3, 2023 16:57 IST

Gas Cylinder Price: रक्षाबंधन पूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांनी घट आली. विरोधकांकडून याच विषयाचे राजकारण करून गॅस सिलिंडरच्या भावात घट ही केंद्रातील मोदी सरकारकडून नागरिकांसाठी निवडणूक गिफ्ट असल्याची टिका केली जात आहे.

- महेश सायखेडेवर्धा -  रक्षाबंधन पूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांनी घट आली. विरोधकांकडून याच विषयाचे राजकारण करून गॅस सिलिंडरच्या भावात घट ही केंद्रातील मोदी सरकारकडून नागरिकांसाठी निवडणूक गिफ्ट असल्याची टिका केली जात आहे. पण वास्तविक पाहता जागतिक बाजारपेठेत भावात घट आल्याने त्याचा थेट परिणाम होत गॅस सिलिंडरच्या भाव गडगडले. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलियम पदार्थांच्या भावात घसरण आल्याने गॅस सिलिंडरच्या दरात घट आली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल यांनी केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्थानिक दादाजी धुनिवाले मठाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या परिवर्तन मेळाव्यात ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुरेश चव्हाण, माजी मंत्री सुबोध मोहिते, क्रांती जांबुवंतराव धोटे, वर्धाचे जिल्हाध्यक्ष शरद सहारे, नागपूरचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, ईश्वर बाळबुधे, प्रशांत पवार, मेघा पवार, रवी पराते, सरोज दाते, बलराज लोहवे, उज्ज्वल काशीकर आदींची उपस्थिती होती.

विरोधकांच्या आघाडीचे नाव इंडिया नाहीचभारत देशाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थिर सरकार हवेच. विरोधक त्यांच्या आघाडीचे नाव इंडिया असे सांगत आहेत. पण विरोधकांच्या आघाडीचे नाव इंडिया नाहीच. ते 'आय डॉट एन डॉट डी डॉट आय डॉट ए' असे आहे. त्यांच्यात लोगोसाठी वाद होत आहे. स्थिर सरकारच देशाचा विकास करू शकते, असेही यावेळी खा. प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.

मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे ही राकाँची भूमिकामराठा आरक्षणा बाबात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा आरक्षणाचा विषय निकाली काढण्यासाठी राकाँचे नेते छगन भुजबळ आणि आपण स्वत: विशेष प्रयत्न करीत आहोत. जालना येथील घटनेची चौकशी होत दोषींवर कारवाई झाली पाहिजे. मराठा आरक्षणाचा तांत्रिक अडचणींचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. तो निकाली निघावा यासाठी प्रयत्नही होत आहेत, असे खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेलCylinderगॅस सिलेंडर