शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ए वॉर्ड - इच्छुकांच्या स्वप्नावर विरजण

By admin | Updated: January 30, 2017 21:44 IST

गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात उपनगरांमध्ये स्थलांतरीत झाली. त्यामुळे पूर्वी सुमारे दोन लाख लोकवस्ती असलेल्या ए विभागात आता ६० हजाराच्या आसपास जनता उरली आहे.

मुंबई - गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात उपनगरांमध्ये स्थलांतरीत झाली. त्यामुळे पूर्वी सुमारे दोन लाख लोकवस्ती असलेल्या ए विभागात आता ६० हजाराच्या आसपास जनता उरली आहे. हीच अवस्था कोलाबा ते दादर या संपूर्ण शहर भागात आहे. परिणामी येथील सात प्रभाग फेररचनेत गायब झाले आहेत. याचा फटका ए विभागाला बसला आहे. थेट दोन प्रभागच फेररचनेत उडाल्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवकाची दांडी गूल झाली आहे. त्याचबरोबर इच्छुकांच्या स्वप्नावरही विरजण पडले आहे. २००८ मध्ये अतिरेक्यांचे लक्ष्य ठरलेला हाच तो विभाग, बधवर पार्क, गेटवे आॅफ इंडिया, नौदलाची हद्द, ताजमहल, मंत्रालय हॉटेल अशा अनेक महत्वाची स्थळ, सरकारी आणि खाजगी कार्यालय तसेच पुरातन व ऐतिहासिक स्थळ या विभागात असल्याने अतिसंवेदनशील असा हा विभाग आहे. सर्वेक्षणाअनुसार या विभागाच्या लोकसंख्येत तब्बल सव्वलाखाने घट झाली आहे. त्यामुळे फेररचनेत येथील प्रभाग क्रमांक २२३ आणि २२४ बाजुच्या बी वार्डमध्ये सरकवण्यात आले आहेत. यामध्ये शिवसेनेचे गणेश सनाप आणि काँग्रेसचे जावेद जुनेजा यांचा पत्ता साफ झाला आहे. फेररचनेत अनेकांच्या प्रभागाचे विभाजन झाले. मात्र या दोघांचा अक्का प्रभागच गायब झाला असल्याने त्यांची पंचाइत झाली आहे. ए विभागात एकुण पाच प्रभाग होते, ज्यामध्ये काँग्रेसचे वर्चस्व आहे. शिवसेनेच्या वाट्याला असलेला एकमेव प्रभाग क्रमांक २२४ ही फेररचनेत उडाला आहे. आता याठिकाणी फक्त २२५, २२६ आणि २२७ हे तीनच प्रभाग उरले आहेत. यामध्ये २२७ या प्रभागातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेले मकरंद नार्वेकर यांनी गेली पाच वर्षे शिवसेनेला समर्थन दिले होते. हा प्रभाग आरक्षणात खुला झाला आहे. त्यामुळे नार्वेकर यांचा दावा असणार आहे. मात्र अन्य प्रभागांमध्ये शिवसेनेला ताकदीचा उमेदवार द्यावा लागणार आहे. ए वॉर्ड प्रभाग क्रमांक -२२५एकूण लोकसंख्या - ६१,३४१अनुसूचित जाती - ६७५३अनुसूचित जमाती - १३२१प्रभागाची व्याप्ती - फोर्ट - ताजमहल हॉटेल - गेट वे आॅफ इंडिया .....................................................................प्रभाग क्रमांक - २२६एकूण लोकसंख्या - ६२,९७८अनुसूचित जाती - ४२४३अनुसूचित जमाती - १६४४प्रभागाची व्याप्ती - नरिमन पॉर्इंट -मच्छीमार नगर - गणेशमूर्ती नगर .....................................................................प्रभाग क्रमांक - २२७एकूण लोकसंख्या - ६०,६९५अनुसूचित जाती - २६५६अनुसूचित जमाती - २२८प्रभागाची व्याप्ती - गीता नगर - चर्च - नेव्ही नगर ..................................................................... २०१२ मधील ए वॉर्डमधील विजयी आणि पराभूत उमेदवारांची माहिती वॉर्ड क्र २२५ विजयी उमेदवार - सुषमा साळुंखे - ६०९३ पराभूत उमेदवार - थाळे विषया गोपीचंद - ५८५३ वॉर्ड क्र २२६विजयी उमेदवार - अनिता यादव - ६५६८पराभूत उमेदवार - हिरा पावले - ६५४८वॉर्ड क्र २२७ विजयी उमेदवार - अ?ॅड. मकरंद नार्वेकर २२०८पराभूत उमेदवार - अरविंद राणे - ९१५..............................................................................ए विभागाची माहिती क्षेत्रफळ 12.5 चौरस किलोमीटर सीमा : पूर्व डॉक भाग, बॅलॉर्ड इस्टेट, शहीद भगतसिंग मार्ग, पी. डिमेल्लो मार्ग, कर्नाक बंदर पूल, अजिंक्य चौक ते नेव्हल डॉकपश्चिम : नेताजी सुभाष मार्ग (मरीन ड्राईव्ह समुद्र) नेव्ही नगर ते फोरस मार्ग जंक्शनउत्तर : आनंदीलाल पोद्दार मार्ग, लोकमान्य टिळक मार्ग आणि ह्यएफह्ण रोड, कर्नाक बंदर पूल, अजिंक्य चौक, पी. डिमेल्लो मार्ग जंक्शदक्षिण: कुलाबा (मिलीटरी क्षेत्र)लोकसंख्या पूर्वी दोन लाख १० हजार .... आता ६०,६९५ रेल्वे स्थानक-दोन, बेस्ट आगार- १ कुलाबा बॅकबेपोलिस स्थानक १ आझाद मैदान महानगरपालिका रुग्णालये १, महानगरपालिका प्रसूतिगृहे नाही महानगरपलिका दवाखाने ५, आरोग्य केंद्रे दोन, खाजगी रुग्णालये आणि सुश्रुषा गृहे१७, स्मशाने नाहीत रस्ते : मोठे: ३९, लहान १३५