शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वॉर्ड : एच/ईस्ट - वर्चस्वासाठी सर्वस्व पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2017 21:53 IST

मुंबईच्या उपनगर जिल्हयातील एच/ईस्ट या वॉर्डलाही नव्या प्रभाग रचनेचा फटका बसला आहे. २०१२ साली पार पडलेल्या महापालिका निवडणूकीवेळी या वॉर्डमध्ये एकूण अकरा प्रभाग होते

मुंबई : मुंबईच्या उपनगर जिल्हयातील एच/ईस्ट या वॉर्डलाही नव्या प्रभाग रचनेचा फटका बसला आहे. २०१२ साली पार पडलेल्या महापालिका निवडणूकीवेळी या वॉर्डमध्ये एकूण अकरा प्रभाग होते. मात्र आता नव्या प्रभाग रचनेनुसार येथील एक प्रभाग कमी झाला असून, येथील एकूण प्रभागांची संख्या दहावर आली आहे. गत निवडणूकीत येथे सेनेला बहुमत प्राप्त झाले असून, येथे सेनेचे एकूण चार नगरसेवक विजयी झाले होते. त्या खालोखाल काँग्रेसचे तीन, मनसेचे दोन, भाजपाचा एक आणि अपक्ष एक नगरसेवक विजयी झाले होते. परिणामी आता सेनेला येथे वर्चस्व टिकवण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे.एच/ईस्ट या वॉर्डमध्ये हनुमान टेकडी, गोळीबार, टी.पी.एस ३, सेन नगर, व्ही.एन.देसाई रुग्णालय, आग्रीपाडा, वाकोला, डवरीनगर, प्रतिक्षानगर, शिवाजीनगर, लालबहादुर शास्रीनगर, गाला कॉलेज, धोबी घाट, कलिना, पी अ‍ॅँड टी कॉलनी, कोर्वेनगर, आय.ए.स्टा कॉर्टर्स, विद्यानगरी, कोले कल्याण व्हिलेज, यशवंत नगर, पोलीस प्रशिक्षण मैदान, एमएमआरडीए ग्राऊंड, बीकेसी, ज्ञानेश्वर नगर, भारत नगर, गव्हर्नमेंट कॉलनी, एमआयजी कॉलनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, गांधीनगर, गोळीबार, राजे संभाजी विद्यालय, जवाहर नगर, खेरवाडी, शिवाजी गार्डन, गव्हर्नमेंट टेक्निकल कॉलेज, निर्मल नगर, वांद्रे टर्मिनस, बेहराम पाडा, गरिब नगर, वांद्रे कोर्ट या परिसरांचा समावेश होतो.येथील पक्षीय बलाबल पाहता वॉर्डात प्रथमदर्शनी सेनेचे प्राबल्य निदर्शनास येत असले तरी लोकसभा आणि विधानसभेला आलेली भाजपाची लाट लक्षात घेता भाजपाने महापालिका निवडणूकीसाठी येथे ‘फिल्डींग’ लावली आहे. शिवाय मनसे, सपा आणि आपसारखे पक्षही कार्यान्वित झाल्याने येथे सेनेला आपली राजकीय ताकद पणाला लावावी लागणार आहे. दुसरीकडे युती आणि आघाडीबाबत अद्यापही स्पष्टता नसल्याने राजकीय पक्षाच्या दावेदारांसह उत्सुक उमेदवारांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्यावर भर दिला आहे. एकंदर महापालिका निवडणूकीची जोरदार रणधूमाळी सुरु झाली असून, त्याच अनुषंगाने विकासकामेही उरकण्यावर या वॉर्डात भर देण्यात येत आहे..........................................प्रभाग क्रमांक ८७आरक्षण खुलाएकूण लोकसंख्या ५७३१५ अनुसूचित जाती १३५५अनुसूचित जमाती १६६प्रभागाची व्याप्ती : हनुमान टेकडी, गोळीबार, टी.पी.एस ३, सेन नगर, व्ही.एन.देसाई रुग्णालय.........................................प्रभाग क्रमांक ८८आरक्षण खुलाएकूण लोकसंख्या ५१७३६ अनुसूचित जाती ८६९अनुसूचित जमाती २८९प्रभागाची व्याप्ती : आग्रीपाडा, वाकोला, डवरीनगर, प्रतिक्षानगर, शिवाजीनगर.........................................प्रभाग क्रमांक ८९आरक्षण इतर मागासवर्गीयएकूण लोकसंख्या ६०८८८ अनुसूचित जाती ३५१६ अनुसूचित जमाती ३९७प्रभागाची व्याप्ती : लालबहादुर शास्रीनगर, गाला कॉलेज, धोबी घाट.........................................प्रभाग क्रमांक ९०आरक्षण इतर मागसवर्गीय (महिला)एकूण लोकसंख्या ५६४६८ अनुसूचित जाती ३१६२अनुसूचित जमाती ४५२प्रभागाची व्याप्ती : कलिना, पी अ‍ॅँड टी कॉलनी, कोर्वेनगर, आय.ए.स्टा कॉर्टर्स.........................................प्रभाग क्रमांक ९१आरक्षण इतर मागसवर्गीयएकूण लोकसंख्या ५५४२८ अनुसूचित जाती २२९५अनुसूचित जमाती ४८७प्रभागाची व्याप्ती : विद्यानगरी, कोले कल्याण व्हिलेज, यशवंत नगर, पोलीस प्रशिक्षण मैदान.........................................प्रभाग क्रमांक ९२आरक्षण खुला (महिला)एकूण लोकसंख्या ५२९५१ अनुसूचित जाती २४०५अनुसूचित जमाती ४३४प्रभागाची व्याप्ती : एमएमआरडीए ग्राऊंड, बीकेसी, ज्ञानेश्वर नगर, भारत नगर.........................................प्रभाग क्रमांक ९३आरक्षण अनुसूचित जाती (महिला)एकूण लोकसंख्या ५८०१४अनुसूचित जाती १०४६२अनुसूचित जमाती ८९७प्रभागाची व्याप्ती : गव्हर्नमेंट कॉलनी, एमआयजी कॉलनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, गांधीनगर.........................................प्रभाग क्रमांक ९४आरक्षण खुला (महिला)एकूण लोकसंख्या ५९९९८ अनुसूचित जाती २०३०अनुसूचित जमाती ४१६प्रभागाची व्याप्ती : गोळीबार, राजे संभाजी विद्यालय, जवाहर नगर.........................................प्रभाग क्रमांक ९५आरक्षण खुलाएकूण लोकसंख्या ४९८०५अनुसूचित जाती ६८९०अनुसूचित जमाती ५०५प्रभागाची व्याप्ती : खेरवाडी, शिवाजी गार्डन, गव्हर्नमेंट टेक्निकल कॉलेज, निर्मल नगर.........................................प्रभाग क्रमांक ९६आरक्षण खुलाएकूण लोकसंख्या ५४६३६ अनुसूचित जाती १५११अनुसूचित जमाती १३७प्रभागाची व्याप्ती : वांद्रे टर्मिनस, बेहराम पाडा, गरिब नगर, वांद्रे कोर्ट.........................................२०१२ साली के/ईस्ट वॉर्डातील विजयी आणि पराभूत उमेदवारवॉर्डविजयी उमेदवारप्राप्त मतेपराभूत उमेदवारप्राप्त मते८१स्नेहल शिंदे, मनसे७७१६शीतल सुतार, काँग्रेस५४०१८२सुखदा पवार, मनसे९७५०हर्षदा परब, सेना८९४९८३सुनैना पोतनीस, सेना८२६१भाग्यश्री मोरे, मनसे६७५४८४ब्रायन मिरिंडा, काँगेस३८७४शशीकांत सांवत, मनसे२७०७८५एलियाझ शेख, अपक्ष३८५०शंकला युनूस, काँग्रेस३३९२८६पूजा महाडेश्वर, सेना६६७५हेलन बर्डे, काँग्रेस५०७३८७कृष्णा पारकर, भाजपा९१८५अब्दुल तांबोळी, एनसीपी ६८५८८८दिपक भूतकर, सेना८६४४जाजू विवेकानंद, काँगेस५६८६८९अनिल त्रिंबकर, सेना५८३८गणेश मांजरेकर, एनसीपी ५४२७९०प्रियतमा सांवत, काँग्रेस६५१३बाळाबाई लोखंडे, मनसे३७६६९१गुलिस्ता शेख, काँग्रेस४८३५यस्मिन शेख, सपा४२६७.........................................