शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये युद्धाचा थरार!

By admin | Updated: January 7, 2016 02:36 IST

पायदळाच्या सूचनांवर बॉम्बगोळ्यांचा वर्षाव करून शत्रूला उद्ध्वस्त करणारे आधुनिक तंज्ञत्रानयुक्त रणगाडे, त्यांच्या मदतीला हवाई हल्ले अन् जवानांची चढाई

अहमदनगर : पायदळाच्या सूचनांवर बॉम्बगोळ्यांचा वर्षाव करून शत्रूला उद्ध्वस्त करणारे आधुनिक तंज्ञत्रानयुक्त रणगाडे, त्यांच्या मदतीला हवाई हल्ले अन् जवानांची चढाई अशा वातावरणात के. के. रेंज परिसरात प्रत्यक्ष युद्धासारखा थरार रंगला. येथील एसीसी अ‍ॅण्ड एस व एमआयआरसी या सैन्य प्रशिक्षण केंद्रातर्फे बुधवारी सकाळी अहमदनगरपासून १५ किमीवरील खारेकर्जुनेच्या माळरानावर हा फायर डेमो पार पडला. सुमारे दहा चौरस किलोमीटरचा परिसर दोन तासांत बेचिराख झाला. पायदळ व रणगाडाचालक यांचा नेमका समन्वय, चालत्या रणगाड्यातून शत्रूच्या हालचाली टिपत एकाच वेळी जमिनीवर व हवेतही केलेला अचूक मारा यातून भारतीय सैन्याची सज्जता, साहस आणि पराक्रमाचा प्रत्यय आला. प्रारंभी पायदळाने शत्रूच्या दिशेने लपतछपत कूच करायची, शत्रू निशाण्यावर आल्यानंतर मागे असलेल्या रणगाडा सैन्याशी (सपोर्ट फायर) समन्वय साधून क्षेपणास्त्रांनी शत्रूचे अड्डे उद्ध्वस्त करायचे, गरज भासलीच तर हवाई हल्ल्यासाठी हेलिकॉप्टर, सुखोई लढाऊ विमाने सज्ज, असा युद्धाचा प्रत्यक्ष थरार पाहून उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. आर्मर्ड कोअर सेंटर अ‍ॅण्ड स्कूलचे कमांडंट मेजर प्रवीण दीक्षित, मॅकेनाईन्ड इन्फट्री रेजिमेंट सेंटरचे ब्रिगेडिअर व्ही. एस. वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हे युद्धाचे प्रात्यक्षिक झाले. प्रात्यक्षिकानंतर रणगाडे, क्षेपणास्त्रे तसेच युद्धात वापरण्यात येणाऱ्या बंदुका, दारूगोळा उपस्थितांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला होता. (प्रतिनिधी)