शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

सामान्यांच्या कोंडमाऱ्याला व्यंगचित्रातून वाट

By admin | Updated: May 5, 2016 06:29 IST

सामान्य माणसाच्या कोंडमाऱ्याला वाट करून देण्याचे माध्यम म्हणजे व्यंगचित्रे. अनेक हिंसाचार व्यंगचित्राच्या माध्यमातून टाळता येतात. व्यंगचित्र ही कला गेल्या काही वर्षांत अनवधानाने दुर्लक्षित राहिली

- मंगेश तेंडुलकरज्येष्ठ व्यंगचित्रकारसामान्य माणसाच्या कोंडमाऱ्याला वाट करून देण्याचे माध्यम म्हणजे व्यंगचित्रे. अनेक हिंसाचार व्यंगचित्राच्या माध्यमातून टाळता येतात. व्यंगचित्र ही कला गेल्या काही वर्षांत अनवधानाने दुर्लक्षित राहिली आहे. ही कला पत्रकारितेचाच एक भाग; मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात ‘व्यंगचित्र’ हा शब्दच नाही. पूर्वीचा काळ पाहिला, तर व्यंगचित्रे चितारताना एक वैचारिक मुक्तता होती. मात्र, आता चारही बाजूंनी व्यंगचित्रकारांवर दडपण आले आहे. पूर्वी समाजात राजकीय सहिष्णुता पाहायला मिळायची. संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष गुण्यागोविंदाने नांदायचे, हसत-खेळत व्यंगचित्रांना सामोरे जायचे. हे चित्र आता पाहायला मिळत नाही. राजकीय असहिष्णुतेमुळे समाजातील वातावरण ढवळून निघत आहे. सध्याच्या काळात सामाजिक, धार्मिक असहिष्णुतेने जोर धरला आहे. या दडपणाखाली व्यंगचित्र रेखाटायचे म्हटले, तर त्याचे दूरगामी परिणाम काय होतील, याचा विचार व्यंगचित्रकाराला करावा लागतो. कोण जाणे, त्या व्यंगचित्राचा काय अर्थ काढला जाईल? इतकी विध्वंसक परिस्थिती उद्भवली आहे. ‘व्यंगचित्रातून परिस्थिती बिघडली तर, तीवर कोण नियंत्रण ठेवणार?’ असा विचार करावा लागतो. कलेच्या क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञानाने शिरकाव केला आहे. अ‍ॅनिमेशन हे त्याचेच एक रूप. व्यंगचित्रांत काही करू पाहताना झपाट्याने पैसे मिळविण्याचे साधन बनलेले अ‍ॅनिमेशन आकर्षित करते. नाव आणि प्रसिद्धीच्या भोवऱ्यात तरुण व्यंगचित्रकार गर्तेत जातो. अशा वेळी गरज असते ती पाठिंब्याची, प्रोत्साहनाची. सध्याच्या काळ हा अटीतटीच्या स्पर्धेचा आहे. या स्पर्धेत पुढे जाण्याऐवजी व्यंगचित्रकार जागच्या जागी राहिले, तर ते गोल-गोल फिरत राहतील आणि नुकसान त्यांच्याच पदरी पडेल. नवीन व्यंगचित्रकाराला लवकर प्रोत्साहन मिळत नाही. अशी परिस्थितीच कायम राहिली, तर व्यंगचित्र चितारणारे किती काळ तग धरू शकतील, हा प्रश्न आहेच. आजकाल संगणकारवर व्यंगचित्रे सहज तयार करता येतात. नेत्याचा फोटो स्कॅन केला, की त्यावर आधारित रेखाचित्र काढायचे. ज्यांना प्रत्यक्षात व्यंगचित्रे चितारता येत नाहीत, ते अशा माध्यमातून प्रसिद्धी मिळवू पाहतात. यामुळेच मूळ व्यंगचित्रकला लोप पावण्याची भीती अधिक गहिरी होत आहे. अशा पद्धतीने माणूसच माणसाची गरज संपवू पाहत असेल, तर तो किती काळ उभारी धरणार? कलेसमोर अनेक संकटे, आव्हाने आ वासून उभी आहेत. या आव्हानांना तोंड देऊन पुढे जाईल तोच टिकेल. आव्हाने असणे केव्हाही चांगलेच; त्यात स्वत:च्या कामावर श्रद्धा असलेले कलाकारच टिकतील. नवोदित व्यंगचित्रकार आव्हाने पेलू शकत नाहीत. त्यांना प्रवाहात आणणे ही वृत्तपत्रे आणि नियतकालिकांची जबाबदारी आहे. व्यंगचित्रे रेखाटणे म्हणजे कुणाचे चारित्र्यहनन नव्हे. आता व्यंगचित्र रेखाटणाऱ्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हादेखील दाखल होतो. त्याला देशाबद्दल आत्मीयता वाटली नसती, तर त्याने व्यंगचित्रेच रेखाटली नसती. सरकारप्रणीत दहशतवाद निर्माण करण्याचाच हा प्रयत्न. त्याचाच परिणाम या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात होत आहे. कलेला मोकळीक मिळाल्याशिवाय ती वृद्धिंगत कशी होणार? कारण, व्यंगचित्रकार कधीच स्वत:ची मते व्यक्त करीत नाही. सरकारदरबारी व्यंगचित्रकला दुर्लक्षित झाली आहे. पाठ्यपुस्तकांतूनही व्यंगचित्रे हद्दपार झाली आहेत. खिलाडू वृत्ती बाद होत आहे. व्यंगचित्रे राजकीय नेत्यांना नकोशी असतात. त्यामुळे व्यंगचित्रकारांचे पाय मागे खेचले जातात. सर्वसामान्यांनी या कलेचे महत्त्व समजून तिला पाठिंबा दिल्यास व्यंगचित्रे पुन्हा ताकदीने दिसू लागतील. कलेचे दरवाजे बंद झाले, तर नवीन कलाकार आत येणार तरी कसा? त्यामुळेच नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. चांगल्या हेतूने कलेची आराधना केल्यास ती नक्कीच प्रसन्न होईल आणि पुन्हा फुलू लागेल, असा विश्वास वाटतो.