प्रत्येक रस्त्यवर खड्यांची बेटे : लिपस्टिक फासली जाणार तोंडावरचलोकमत पाहणी प्राची मानकर/प्रीती जाधवपुणे : 'ज्या दिवशी रिक्षामध्ये बसून लिपस्टिक सहजपणे लावता येईल त्या दिवशी शहरातील सर्व खड्डे बुजले म्हणून समजावे......!- एक पुणेरी तरुणी' पुण्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्यांच्या पार्श्वभूमीवर हा मेसेज सध्या फिरतोय. खरोखरच काय परिस्थिती आहे, यासाठी 'लोकमत टीम'ने रिक्षातून पुण्यातील रस्त्यांवरून रिक्षाने प्रवास केला. या वेळी लिपस्टिक लावणेच काय, थोडेसे जरी दुर्लक्ष झाले तरी कपाळमोक्षच व्हायची भीती, अशी पुण्यातील रस्त्यांची स्थिती असल्याचे विदारक चित्र दिसून आले. लोकमतच्या प्रतिनीधींनी पुण्यातील मध्यवस्तीत पाहणी केली. या रस्त्यावरून रिक्षात जाताना लिपस्टिक लावण्याचा प्रयत्न करायचा आणि ठराविक अंतरावर येणाऱ्या खड्यांमुळे धक्के बसून ती तोंडावरच फासली जाण्याचीच तरुणींना भीती असा अनुभव आला. अगदी काही दिवस पाऊस पडला तर ही अवस्था झालेली पुढच्या दोन महिन्यात जास्त पावसाने खड्यांतच रस्ता शोधावा लागायचा...
रिक्षातून फिरताना मेकअपऐवजी कपाळमोक्षाचीच भीती....
By admin | Updated: July 31, 2016 17:11 IST