शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त जेलर जाधवविरुद्धच्या तक्रारीबद्दल पाच वर्षांनी जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:01 IST

गृहविभागाकडून चौकशी समितीची स्थापना : आयपीएस अस्वती दोरजे करणार तपास

मुंबई : महाराष्ट्र कारागृहसेवेतील सर्वाधिक वादग्रस्त वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाºया, निलंबित अधीक्षक हिरालाल जाधव यांच्याविरुद्धच्या एका तक्रारीबद्दल राज्य सरकारला तब्बल पाच वर्षांनंतर जाग आली आहे. त्याच्या वर्तणुकीबद्दल तब्बल १७ महिला अधिकाºयांनी केलेल्या लैंगिक छळाबाबतच्या तक्रारीच्या चौकशीसाठी गृहविभागाने स्वतंत्र पाच जणांच्या समितीची स्थापना केली आहे. मुंबईतील सशस्त्र विभागाच्या (एलए) अपर आयुक्त अस्वती दोरजे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.गेली जवळपास दोन वर्षे निलंबित असलेला जाधव २०१६ मध्ये येरवडा येथील दौलतराव जाधव प्रशिक्षण महाविद्यालयात प्राचार्य असताना, त्या ठिकाणी प्रशिक्षण घेत असलेल्या १७ उपनिरीक्षक तरुणींनी त्यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दिली होती. त्याबाबत प्राथमिक चौकशी झाल्यानंतर, गेली चार वर्षे या प्रकरणाची फाइल धूळ खात पडली होती. दरम्यानच्या काळात ठाणे कारागृहात रुजू झाल्यानंतर तेथेही महिला कर्मचाºयाशी अश्लील वर्तन केल्याने निलंबित झाले. याबाबत पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला आहे.दौलतराव जाधव ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत असताना, त्याच्याविरुद्ध आलेल्या तक्रारीवर प्राथमिक चौकशीनंतर त्यांच्यावर ५ दोषारोप ठेवले आहेत. त्याबाबत विशाखा केसच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाºयांच्या होणाºया लैंगिक छळाला प्रतिबंध व त्याचे निवारण करण्यासाठी गृहविभागाने चौकशी समितीची स्थापना केली आहे. या समितीने दोन महिन्यांत या प्रकरणाचा तपास करून, त्याचा अहवाल विभागाला सादर करावयाचा आहे. मात्र, जाधव यांच्याविरुद्धच्या यापूर्वीच्या तक्रारीबद्दल नेमलेल्या चौकशी अद्याप प्रलंबित आहेत. त्याला अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.ट्रेनिंग कॉलेजमधील प्रकरणहिरालाल जाधव हे २०१६मध्ये येरवड्यातील कारागृहाच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत असताना, तेथे प्रशिक्षणासाठी आलेल्या उपनिरीक्षक तरुणींशी अश्लील वर्तन करीत होता. त्यांच्या छळाला कंटाळून १७ जणींनी एकत्रितपणे वरिष्ठांकडे तक्रार दिल्याने मोठी खळबळ उडाली होती.त्याबाबत तुरुंग विभागाचे उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी प्राथमिक चौकशी करून, ६ डिसेंबर २०१३ मध्ये अहवाल दिला होता. त्यानंतर, जाधव यांचे निलंबन झाले. मात्र, विभागीय चौकशी मुदतीत पूर्ण न झाल्याने, सुमारे दीड वर्षाने ठाणे कारागृहात अधीक्षक म्हणून रुजू झाले. त्या ठिकाणीही तोच कित्ता गिरवल्याने आॅगस्ट २०१६ मध्ये पुन्हा निलंबित करण्यात आले.कोण आहे चौकशी समितीमध्येअपर आयुक्त अस्वती दोरजे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या सचिव येरवडा कारागृहाच्या उपअधीक्षक अरुणा मुगुटवार आहेत. तर मुंबईच्या समाजसेवा विभागाचे सहायक आयुक्त अरविंद सावंत, अ‍ॅड. अनुपमा पवार, स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्या फरिदा लांबे या सदस्या आहेत.वादग्रस्त प्रकरणेहिरालाल जाधव यांची कारकिर्द कायमच वादग्रस्त राहिली आहे. विशेषत: महिलांशी गैरवर्तणुकीबद्दल कोल्हापूर, औरंगाबाद, येरवडा, ठाणे या ठिकाणी काम करीत असताना तक्रारी झाल्या आहेत.दोन वर्षांपूर्वी ठाणे मध्यवर्ती कारागृहात जेलर असताना, एका महिला कर्मचारीला २६ आॅगस्ट, २०१६ रोजी कळवा पूल येथे बोलावून शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला. दुसºया दिवशी मोबाइलवर अश्लील मेसेज पाठविले होते. ठाणेनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.जाधव हे ठाणे कारागृहातील काही कैद्यांकडून मोठी रक्कम घेऊन जेलमध्ये पंचतारांकित सुविधा पुरवितात, अशी तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. त्या प्रकरणाची चौकशी प्रलंबित आहे.दीड वर्षांपूर्वी भायखळा महिला कारागृहात मंजुषा शेटे हिची अमानुष मारहाण करून, हत्या करून मारहाण करणाºया महिला तुरुंगाधिकारी मनीषा पोखरकर व अन्य पाच महिला रक्षकांना वाचविण्यासाठी उपमहानिरीक्षक स्वाती साठे या प्रयत्नशील आहेत, असा आरोप जाधव यांनी केला होता. त्याबाबतचा व्हॉट्सअप मॅसेज व्हायरल झाला होता.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळjailतुरुंग