लोकमत न्यूज नेटवर्कअमळनेर (जि. जळगाव) : भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अनुभवाची सरकारला गरज आहे. नाथाभाऊंच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाच्या दिवसाची आम्ही वाट पाहत आहोत, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी येथे केले.आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाजन हे मंगळदेव मंदिरात आरती करण्यासाठी आले होते. शेतकऱ्यांना कायमचे कर्जमुक्त कर आणि यावर्षी चांगला पाऊस पडून राज्यातील धरणे १०० टक्के भरु दे, अशी प्रार्थना त्यांनी केली.महाजन म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाने ३२ हजार कोटी खर्च केले. त्यामुळे विविध विकास कामांच्या निधीत कपात होईलच. मात्र शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या शेतापर्यंत पाणी जाणे गरजेचे असल्याने जलसंपदा खात्याच्या निधीत कोणतीही कपात होवू देणार नाही.
नाथाभाऊंची मंत्रिमंडळात पुनरागमनाची प्रतीक्षा
By admin | Updated: July 5, 2017 04:19 IST