शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   
2
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप  
3
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
4
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
5
पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी
6
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
7
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
8
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
9
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
10
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
11
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
12
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
13
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
14
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

जवानांना पोलीस दलात बदलीची प्रतीक्षा !

By admin | Updated: February 3, 2015 01:33 IST

राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) दीड हजार जवानांना जिल्हा पोलीस दलात परतीची प्रतीक्षा आहे.

राजेश निस्ताने ल्ल यवतमाळराज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) दीड हजार जवानांना जिल्हा पोलीस दलात परतीची प्रतीक्षा आहे. अपर महासंचालकांच्या नाराजीमुळे ही प्रक्रिया रखडल्याने या जवानांनी आता न्यायालयाचे दार ठोठावले आहे. राज्यात एसआरपीएफचे १५ ग्रुप असून, त्यात सुमारे २३ हजार जवानांचा समावेश आहे. एसआरपीएफमध्ये सलग १० वर्षे सेवा झालेल्या जवानांची जिल्हा पोलीस दलात बदली केली जाते. त्यासाठी नोकर भरतीच्या १० टक्के जागा प्रत्येक जिल्ह्यात आरक्षित केली जाते. सन २००१मध्ये यासंबंधीचा आदेश शासनाने जारी केला. त्यानुसार गेली १३ वर्षे नियमित कारवाई सुरू आहे. मात्र २०१४मध्ये अपर पोलीस महासंचालक परमवीरसिंग यांच्या एका पत्राने एसआरपीएफ जवानांची पोलीस दलातील बदलीची प्रक्रिया खंडित केली. एसआरपीएफमधील रिक्त जागा आणि लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे कारण पुढे करून २०१४मध्ये जवानांना बदलीवर न सोडण्याचा निर्णय घेतला गेला. त्यासंबंधीचे आदेश सिंग यांनी जारी केले. त्यामुळे राज्यातील सुमारे १ हजार ६०० जवान २०१४मध्ये पोलीस दलातील बदलीपासून वंचित राहिले. अखेर पुणे येथील मेजर तथा सहायक उपनिरीक्षक नितीन पराळे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे (मॅट) याचिका दाखल केली. त्यावर मॅटने एसआरपीएफ जवानांची बाजू उचलून धरताना तीन महिन्यांत त्यांना बदलीवर सोडा आणि अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. एवढेच नव्हे तर, शासनाच्या निर्णयात पोलिसांना आपल्या पद्धतीने फेरबदल अथवा हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असेही सुनावले. मात्र नेमकी त्या वेळी निवडणुकांची आचारसंहिता लागल्याने या निर्णयावर कार्यवाही केली गेली नाही. दरम्यान, शासनाने मॅटच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. तेथे न्या. मोहता आणि न्या. जामदार यांच्या खंडपीठाने एसआरपीएफ जवानांच्या बदल्या केव्हा करणार, अशी विचारणा करताना शासनाला फटकारले. शिवाय २०१४च्या भरतीतील १० टक्के जागा एसआरपीएफ जवानांसाठी रिक्त ठेवण्याचे निर्देश दिले. त्या वेळी एसआरपीएफमध्ये रिक्त जागा नाही, येथील जवान ट्रेनिंग सेंटर, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी)मध्ये प्रतिनियुक्तीवर असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. च्हे प्रकरण न्या. नरेश पाटील आणि न्या. ए. एस. गडकरी यांच्या खंडपीठापुढे सुरू आहे. तीन तारखा होऊनही प्रकरण बोर्डावर आले नाही. आता पुढील तारखेवर न्यायालय काय निर्णय देते, याकडे लक्ष लागले आहे. इकडे मॅटच्या आदेशावर अंमलबजावणी केली नाही, म्हणून एसआरपीएफ जवानांच्या वतीने शासनाविरुद्ध मॅटमध्येच अवमान याचिका दाखल करण्यात येणार आल्याचे सूत्रांनी सांगितले.