शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

‘प्रतीक्षा’ संपली; ‘ती’ मात्र पास झाली!

By admin | Updated: May 30, 2017 22:33 IST

जखम झाल्यानंतर जेवढ्या वेदना होतात त्याहीपेक्षा जास्त वेदना जखमेची खपली निघाल्यानंतर जाणवतात. कोळेतील काकडे कुटुंबीयही सध्या

ऑनलाइन लोकमत
क-हाड (सातारा), दि. 30 - जखम झाल्यानंतर जेवढ्या वेदना होतात त्याहीपेक्षा जास्त वेदना जखमेची खपली निघाल्यानंतर जाणवतात. कोळेतील काकडे कुटुंबीयही सध्या अशाच वेदनांनी घायाळ झालेत. बारावीत नापास होण्याच्या भीतीने त्यांची मुलगी प्रतीक्षाने आत्महत्या केली. ही जखम आजही ताजी असतानाच मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये प्रतीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याचे समजले. त्यामुळे कुटूंबियांच्या अश्रूचा बांध फुटला. 
क-हाड तालुक्यातील कोळे येथे उत्तम काकडे वास्तव्यास आहेत. पत्नी उमा, मुली प्रतीक्षा, साक्षी व मुलगा वेदांत असे पाचजणांचे हे कुटूंब. उत्तम काकडे यांना गुंठाभरही शेती नाही. तसेच उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. त्यामुळे ते दुस-याच्या शेतात तसेच विहीरीच्या कामावर मजुरी करतात. संसाराला हातभार लागावा यासाठी त्यांनी घरानजीकच पान शॉप सुरू केले आहे. मात्र, त्यातून मिळणारा नफाही अत्यल्प. या सर्व परिस्थितीतून मार्ग काढत असतानाही उत्तम यांनी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. एकवेळ आपल्या गरजा बाजुला सारून त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च केले. मोठी मुलगी प्रतीक्षा हिने नुकतीच बारावीची तर साक्षीने दहावीची परीक्षा दिली. दोन्ही मुली अभ्यासात हुशार. त्यामुळे दोघीही परिक्षेत पास होतील, ही कुटूंबियांना अपेक्षा. मात्र, प्रतिक्षाला बारावीच्या परिक्षेत नापास होण्याची भिती होती. या भितीनेच तिला काही दिवसांपासून ग्रासले होते. ती अबोल रहायची. आई-वडील त्याबाबत तिला विचारायचे. मात्र, ती प्रत्येकवेळी तीने वेळ मारून नेली. नैराश्याचे कारण तीने कधीच ओठावर आणले नाही. त्यामुळे कुटुंबीयही तिच्या मनात नेमके काय चालू आहे, याबाबत अनभिज्ञ राहिले. अशातच ‘तो’ दिवस उजाडला.
काकडे कुटुंबीयांसाठी २२ मे हा दिवस तसा रोजचाच. वडील उत्तम काकडे हे पोतले येथे एका विहीरीच्या कामासाठी गेले. तर साक्षी व वेदांत जेवण करून बाहेर खेळण्यासाठी गेले. आई उमा या घरातील काम आटोपण्यात व्यस्त होत्या. याच कालावधीत प्रतीक्षाने घरातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. घरकाम करतानाच आईने प्रतिक्षाला हाक मारली. मात्र, तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आई तिच्या खोलीत गेली. त्यावेळी प्रतिक्षाने गळफास घेतल्याचे दिसून आले. 
दोरीला लटकत असलेला प्रतिक्षाचा मृतदेह पाहून आई उमा यांनी हंबरडा फोडला. परिसरातील ग्रामस्थ जमा झाले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वडील उत्तम हेही तातडीने घरी पोहोचले. मुलीचा मृतदेह पाहून त्यांनाही अश्रू अनावर झाले. प्रतीक्षाने आत्महत्या का केली, या प्रश्नाने त्यावेळी कुटुंबीयांसह नातेवाईकांच्या मनातही घर केले. अखेर बारावीच्या परिक्षेत नापास होण्याच्या भीतीमुळे प्रतिक्षाने हे पाऊल उचलले असावे, असा कयास कुटुंबीयांनी काढला. प्रतिक्षाच्या अचानक जाण्यामुळे आठ दिवसापासून काकडे कुटुंबीय दु:खात बुडाले आहे. 
त्यातच मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यावेळी कुटुंबीयांनी प्रतीक्षाचा निकाल वेबसाईवर पाहिला. आणि पुन्हा त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. नापास होण्याच्या भितीने प्रतिक्षाने आत्महत्या केली. मात्र, ती परिक्षेत प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्याचे निकालातून स्पष्ट झाले. 
 
बहिणीला करायची अभ्यासात मदत...
बहिण-भावंडांमध्ये प्रतिक्षा सर्वात मोठी. त्यामुळे तिच्या पावलावर पाऊल टाकत इतर भावंडे वागायची. प्रतीक्षाची लहान बहिण साक्षी हिने दहावीची परिक्षा दिली आहे. तिला प्रतिक्षाने अभ्यासात मदत केली होती. तसेच अभ्यास कसा करायचा, हेही तिने साक्षीला समजावून सांगितले होते. प्रतीक्षाने घेतलेल्या अभ्यासामुळे साक्षीला परिक्षेत कोणतीच अडचण आली नाही. साक्षीच्या परिक्षेचा निकालही येत्या काही दिवसात लागणार आहे. 
 
मराठी विषयात जास्त गुण...
मराठी हा प्रतीक्षाच्या आवडीचा विषय. ती वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत असली तरी तिला मराठी विषयात विशेष रूची होती, असे कुटुंबीय सांगतात. या परीक्षेतही तिला इतर विषयांपेक्षा मराठीतच जास्त गुण मिळाले आहेत. परिक्षेत तीला सुमारे साठ टक्के गुण मिळाले. त्यामध्ये मराठी विषयात ७०, इंग्रजी ४६, अर्थशास्त्रमध्ये ५७, अकाऊंट ६४, आॅर्गनायझेशन आॅफ कॉमर्स ५३, इन्च्हायरोमेंट एज्युकेशन ४७ व सेक्रेटरीअल प्रॅक्टीस या विषयात तीला ५३ गुण मिळाले. ६५० पैकी ३९० गुण मिळवून प्रतिक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाली आहे.