शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

‘पीएफ’च्या प्रतीक्षेने कामगार संतप्त

By admin | Updated: September 21, 2016 02:13 IST

औद्योगिक परिसरात हजारो कामगार आपल्या भविष्याचे स्वप्न रंगवत दररोज ८ ते १२ तास घाम गाळतात.

भोसरी : औद्योगिक परिसरात हजारो कामगार आपल्या भविष्याचे स्वप्न रंगवत दररोज ८ ते १२ तास घाम गाळतात. पण कारखानदार व त्यानी नेमलेले एजंट यांची असंवेदनशीलता, गलथान कारभार यामुळे हजारो कामगारांना त्यांच्या हक्काचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) वेळेवर भविष्य निर्वाहनिधी कार्यालयाकडे भरला जात नाही आणि जरी निधी कार्यालयात भरला, तरी तो मिळविण्यासाठी कामगारांना हलेपाटे मारण्याची वेळ येते.एमआयडीसीतील असंघटित कामगाराला निवृत्तिवेतन मिळत नाही. त्यामुळे उतारवयातील उदरनिर्वाहाची सोय म्हणून पीएफची रक्कम कामगारांना महत्त्वाची वाटते. निवृत्तीच्या वेळी मोठी रक्कम हाती येईल किंवा अडीअडचणीच्या वेळी ती कामी येईल, अशी कामगारांना अपेक्षा असते. किंबहुना नवीन कंपनीत रुजू होण्यापूर्वी सर्व प्रकारची चौकशी करून जुन्या कंपनीतील खाते स्थलांतरित करून सर्वसामान्य कर्मचारी भविष्य अधिकाधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, गेल्या काही वर्षांत भोसरीसह औद्योगिक परिसरात उघड झालेले घोटाळे आणि सरकारी आकडेवारी पाहता कंपन्यांकडून प्रॉव्हिडंट फंड भरण्यात दिरंगाई होत असल्याचे उघडकीस आले आहे. अर्ज केल्यानंतर फक्त काही दिवसांत पैसे बँक खात्यावर जमा होतील, अशा वल्गना केल्या जातात. प्रत्यक्षात मात्र, पीएफ रक्कम मिळविण्यासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ कामगारांवर येते. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांमध्ये संतपाची भावना निर्माण झाली आहे. (वार्ताहर)