शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

जावईबापूंना आमंत्रणाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 17, 2015 01:19 IST

जावईबापूंच्या स्वागताचा आणि दान-धर्मासाठी शुभ असणाऱ्या अधिक महिन्याला बुधवारपासून ( दि. १८) सुरुवात होत आहे.

पिंपरी : जावईबापूंच्या स्वागताचा आणि दान-धर्मासाठी शुभ असणाऱ्या अधिक महिन्याला बुधवारपासून ( दि. १८) सुरुवात होत आहे. त्यामुळे जावई खुशीत असून, सासऱ्यांच्या आमंत्रणाची वाट पाहत आहेत. तीन वर्षांमधून एकदा हा महिना येतो. पंचांगाप्रमाणे चंद्रमासाचे ३५५ दिवसांचे वर्ष असते. परंतु, इंग्रजी वर्ष ३६५ दिवसांचे असते. प्रतिवर्षी ११ दिवस चंद्रमास सौर वर्षापेक्षा कमी असतो. प्राचीन शास्त्रानुसार जर तीन वर्षांनी किंवा पंचागातील अचूक माहितीप्रमाणे ३२ महिने १६ दिवसांनी एक महिना अधिक येतो. या काळात सूर्याची गती मंद असते. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सूर्याला ३० दिवसांपेक्षा कमी कालावधी लागतो. या काळाला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. या वर्षी या महिन्याला बुधवारपासून (दि. १७) सुरुवात होत आहे. तर १६ जुलैला हा महिना संपणार आहे. या काळात मुलगी आणि जावयाला लक्ष्मी-नारायणाचा जोडा समजले जाते. जावईसाठी ३३ अनारसे एका पेटीत तयार केले जातात आणि चांदीच्या भांड्यामध्ये ठेवून त्यांना दिले जातात. या काळात मोठ्या प्रमाणात दानधर्म करण्याची प्रथा आहे. परंतु, ‘हाय-फाय’ जमान्यामध्ये या महिन्यात जावईबापूंची चांगलीच बडदास्त ठेवली जाते. त्यांना सासरी बोलावून सोन्याच्या वस्तू दान म्हणून दिल्या जातात. त्यांच्यासाठी पंचपक्वान्नाचे जेवण ठेवले जाते. गेल्या महिन्यातच लग्न झालेल्यांना अधिक महिन्यामुळे सासऱ्याच्या पाहुणचाराची नामी संधी मिळाली आहे. या महिन्यामध्ये पुरणाचे दिंड करून मित्रांना वाटले जातात. तसेच पुरणपोळीचे जेवणही दिले जाते. पुरणाच्या दिंडांना ‘धोंडा’ असे म्हटले जाते. त्यामुळे हा महिना धोंडा महिना म्हणूनही ओळखला जातो. या महिन्यामध्ये गावांमध्ये हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. त्यात कीर्तन, प्रवचनाचा समावेश असतो. तीर्थयात्रा काढल्या जातात. गावातील प्रतिष्ठित कुटुंबे मोठ्या प्रमाणात अन्नदान करतात. (प्रतिनिधी)खरेदीला वावडेया महिन्यामध्ये जमीन, घर, सोने यांसारख्या वस्तू खरेदी केल्या जात नाहीत. त्यामुळे दुकानदारांच्या दृष्टीने हा महिना तंगीचा महिना म्हणून ओळखला जातो. नवविवाहिता माहेरी नवविवाहित महिलांना या महिन्यांमध्ये काही दिवस माहेरी पाठविण्याची प्रथा आहे. यामुळे त्यांना माहेरपणाचा आनंद घेता येतो.