शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
4
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
5
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
6
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
7
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
8
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
9
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
10
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
11
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
12
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
13
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
14
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
15
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
16
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
17
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
18
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
19
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
20
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय

कुलगुरूपदाचं बीज रुजता रुजेना...

By admin | Updated: May 13, 2015 00:54 IST

सहा महिन्यांपासून प्रभारी : दापोली कृषी विद्यापीठाला कुलगुरूंची प्रतीक्षा

शिवाजी गोरे - दापोली -राज्यातील कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचे आदेश रखडल्याने नव्या कुलगुरूपदाच्या निवडीला सध्यातरी पूर्णविराम मिळाला असून दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरूपद अद्यापही रिक्तच आहे. कुलगुरूपदाचे निकषसरकारने निश्चित न केल्यामुळे हे पद गेली ६ महिने रिक्त आहे.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. किसन लवांडे २० डिसेंबरला सेवानिवृत्त झाले. त्यामुळे या पदासाठी सरकारने निवड समिती स्थापन केली. लवांडे निवृत्त होण्याअगोदर तीन महिने निवड समितीने जाहिरात देऊन उमेदवारी अर्ज मागविले. अर्जाची छाननी होऊन पात्र उमेदवारांच्या मुलाखतीसुद्धा घेतल्या होत्या. मात्र, पात्र उमेदवारच कुलगुरू पदाला लायक नसल्याचा शेरा मारून निवड समितीने पात्र उमेदवारांची निराशा केली. त्यानंतर सरकारने कुलगुरूनिवडीचे निकष काय असावेत, याबाबत चारही कृ षी विद्यापीठांकडून सल्ला घेऊन कुलगुरू पदाबद्दल नवीन निकष लावण्याबाबत विचारविनिमय सुरू केला. पूर्वीचा संचालक पदाचा कार्यकाल पाच वर्षांचा होता. मात्र, यामध्ये राज्यात एकही पाच वर्ष निकष पूर्ण करणारा संचालक न मिळाल्याने राज्यातील कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचे निकष बदलून ३ वर्ष संचालक किंवा ८ वर्षे प्राध्यापक पदाचा अनुभव ही अट लागू करण्याबाबत शासनदरबारी हालचाली सुरू झाल्या; परंतु हा आदेशसुद्धा बाहेर न पडल्याने दापोली कृषी विद्यापीठाला हक्काचा कुलगुरू मिळणार कधी ? असा सवाल केला जात आहे. कामे रखडलीदापोली कृषी विद्यापीठाला कुलगुरूनसल्याने कामेसुद्धा रखडली आहेत. त्यामुळे नव्या निकषात पद भरण्याची मागणी होत आहे. निकष ठरवा व भरती घ्या, अशी मागणी व्यक्त होत आहे.