शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

दुपारनंतर मतदानाचा टक्का वधारला

By admin | Updated: October 15, 2014 14:22 IST

विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का दुपारनंतर वधारला असून दुपारी एक वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२ टक्के मतदान झाले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का दुपारनंतर वधारला असून दुपारी एक वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२ टक्के मतदान झाले आहे. 
महाराष्ट्राच्या २८८ तर हरियाणाच्या ९० जागांसाठी बुधवारी सकाळी मतदानाला सुरूवात झाली. सकाळी मतदानाला अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र सकाळी अकरानंतर मतदारांचा प्रतिसाद वाढत गेला. किरकोळ अपवाद वगळता राज्यात सर्वत्र शांततेत मतदान सुरु आहे. मतदारांनी मतदान करावे यासाठी सेलिब्रीटीही वारंवार आवाहन करत आहेत. 
महाराष्ट्रातील ८ कोटी जनता ४११९ उमेदवारांचे तर हरियाणातील १.६० कोटी जनता १३५१ उमेदवारांचे भवितव्य ठरवत आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसेल तरी पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधारकार्ड, मनरेगा कार्ड, पॅनकार्ड, बॅक अथवा पोस्ट यांची फोटो असलेली खातेपुस्तिका तसेच छायाचित्र असलेली पेन्शनची कागदपत्रे या पर्यायी ओळखपत्रांसह मतदान करता येऊ शकते.
महाराष्ट्रात यावेळेस काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि मनसे या पाचही पक्षांचे उमेदवार रिंगणात असल्याने पंचरंगी लढत पहायला मिळणार आहे. या निवडणुकीत राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 
मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली असून दोन लाख राज्य पोलिसांच्या मदतीला निमलष्करी दलाची मोठी कुमक असेल. 
 
दुपारी एक वाजेपर्यंत झालेले मतदान
उस्मानाबाद - ३५ टक्के, भंडारा - ३३ टक्के, यवतमाळ - २९.७९ टक्के, हिगोली - ३६ टक्के, औरंगाबाद - ३२.३५ टक्के, पुणे - ३३ टक्के, लातूर - ३७ टक्के, धुळे - ३१. ३७ टक्के, नंदुरबार - ३४. ११ टक्के,  अकोला - २४ टक्के, यवतमाळ २९ टक्के, बीड - ३२.७० टक्के, मुंबई २१.६ टक्के, बुलढाणा २८ टक्के, मुंबई उपनगर - २६ टक्के, अमरावती - २८.१५ टक्के, 
कोल्हापूर - ३२ टक्के, नांदेड - ३५ टक्के, सिंधुदुर्ग - २८ टक्के, सांगली ३७.७० टक्के, वाशिम - २७ टक्के, सातारा - ३४ टक्के, ठाणे - २१.१९ टक्के, गोंदिया - ३९ टक्के, पालघऱ - २९ टक्के
 
तांत्रिक बिघाडांमुळे मतदान यंत्रे निकामी
नागपूरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे मतदान यंत्र बंद पडले असून मतदानाची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. तसेच नाशिकमधील मनपा शाळेतील एक मतदान यंत्रही बंद पडल्याचे समजते. तर मुंबईतील शिवडी येथेही बीडीडी चाळीतील बूथवर मतदान यंत्र बंद पडले आहे. 
 
मतदार यादीत नाव नसल्याने मशिन फोडले
सातारा येथील पाटण तालुक्यातील भुरकेवाडी येथे एका कार्यकर्त्याने मतदार यादीत नाव नसल्याने व्होटींग मशिन जमिनीवर आदळून फोडले. या घटनेनंतर पोलिसांनी त्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले तसेच केंद्रात नवीन मशिनही बसवण्यात आले.
 
 
विदर्भात मुसळधार पाऊस 
विदर्भात मुसळधार पावसामुळे मतदानावर परिणाम झाला असून रामटेक येथे मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. वनेर येथे पारशिवनीत आवडेघाटातील एका मतदान केंद्रावर वीज कोसळल्याने एक पोलीस ठार झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.
 
सेलिब्रिटींनीही बजावला मतदानाचा हक्क
सर्वसामान्य जनतेप्रमाणे अनेक सेलिब्रिटींनीही बुधवारी मतदानाचा हक्क बजावला. मतदार यादीत नाव नसल्याने गुणी अभिनेता अतुल कुलकर्णीला लोकसभा निवडणुकीत मतदान करता आले नव्हते. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी त्याने बुधवारी सकाळीच मुंबईत मतदान केले. तर अभिनेता अभिषेक बच्चनने त्याची आई जया बच्चनसह मतदान केले. अभिनेत्री रेखानेही सकाळी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. तर सचिन तेंडुलकरनेही पत्नीनीसह मतदान करत मतदारांना आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले. याशिवाय उद्धव ठाकरे, राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनीही मतदानाचा हक्क बजावला.