चिकणघर : ‘आंबिवली-मोहिली सर्वपक्षीय ग्रामविकास संघर्ष समिती’ने मतदानावर टाकलेला बहिष्कार दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी झुगारला आणि मतदान केले. ग्रामस्थांनी २००२ पासून असुविधांच्या निषेधार्थ मनपा प्रशासनाविरोधात निवडणुकांवर बहिष्कार सुरू केला होता. आतापर्यंत आठ वेळा बहिष्कार यशस्वी झाला होता. मात्र, या वेळी मतदानासाठी उत्सुक असलेल्या ग्रामस्थांनी अखेर बहिष्कार झुगारून मतदान केले.आंबिवली येथील दोन हजार २३६ मतदारांपैकी ९३९ मतदारांनी, तर मोहिली येथील एक हजार ३७५ मतदारांपैकी ५७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या दोन्ही गावांतील तीन हजार ६११ मतदारांपैकी १५०९ मतदारांनी बहिष्कार झुगारून मतदान केले.
बहिष्कार झुगारून ग्रामस्थांचे मतदान
By admin | Updated: October 16, 2014 05:12 IST