शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
4
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
5
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
6
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
7
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
8
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
9
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
10
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
11
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
12
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
13
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
14
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
15
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
16
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
17
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
18
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
19
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
20
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या

भिवंडी, पनवेल, मालेगावमध्ये आज मतदान

By admin | Updated: May 24, 2017 02:28 IST

मुंबईच्या वेशीवरील पनवेल व भिवंडी महानगरपालिकेसाठी बुधवार, २४ मे रोजी मतदान होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी/पनवेल : मुंबईच्या वेशीवरील पनवेल व भिवंडी महानगरपालिकेसाठी बुधवार, २४ मे रोजी मतदान होत आहे. पनवेल महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक असून, रायगड जिल्ह्यातील पहिलीच महापालिका म्हणून या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तर भिवंडीत मतदानाच्या बंदोबस्तासाठी जवळपास अडीच हजार पोलीस तैनात करण्यात आले असून, साडेचार हजार कर्मचारी प्रत्यक्ष मतदानाची व्यवस्था पाहणार आहेत. बंदोबस्तासाठी ड्रोनचा होणारा वापर हाही या वेळी चर्चेचा विषय आहे. पनवेलमधील एकूण २० प्रभागांतील ७८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. महापालिका क्षेत्रात ४ लाख २५ हजार मतदार असून, निवडणुकीसाठी ४१८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपा-आरपीआय युती, शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची आघाडी, शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना युती व अपक्ष अशी चौरंगी लढत या निवडणुकीत पाहावयास मिळणार आहे. महापालिका क्षेत्रातील ५७० केंद्रांवर अडीच हजारांवर पोलीस बंदोबस्त आहे. तर चार हजारांहून अधिक निवडणूक कर्मचारी तैनात आहेत. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या वतीने विविध उपाय राबविण्यात आले असून, मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी यंदा प्रथमच सेल्फी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागात पाच याप्रमाणे एकूण १०० विजेत्यांना २५ टक्के करसवलत देण्यात येणार आहे. भिवंडीच्या २३ प्रभागांतील ९० जागांसाठी होत असलेल्या मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना प्रचारात उतरवून प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत भाजपाने कोणार्क आघाडीशी समझोता केला आहे. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीने आघाडी केली आहे; पण काँग्रेस, शिवसेना, भिवंडी डेव्हलपमेंट फ्रंट, मनसे, एमआयएम, रिपब्लिकन पक्षांचे विविध गट यामुळे निवडणूक बहुरंगी ठरली आहे. भिवंडीत चार लाख ७९ हजार २५३ मतदार आहेत. त्यात दोन लाख ९१ हजार ९९१ पुरुष आणि एक लाख ८७ हजार २६० महिला आहेत. तृतीयपंथी मतदार दोन आहेत. ६३७ बुथ तयार करण्यात आले आहेत. शुक्रवारी मतमोजणी भिवंडी- निजामपूर, मालेगाव व पनवेल महानगरपालिका, धारणी पंचायत समिती, नागभीड नगर परिषद आणि नेवासा, रेणापूर व शिराळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध ७ नगर परिषदांतील ११ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी बुधवारी मतदान होत आहे. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. सर्व ठिकाणी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत मतदान होईल. २६ मे रोजी मतमोजणी होईल. तिन्ही महापालिकेच्या एकूण २५२ जागांसाठी १ हजार २५१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण १२ लाख ९६ हजार ०२६ मतदारांसाठी १ हजार ७३० मतदान केंद्रांची व्यवस्था आहे. आवश्यक तेवढी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे देण्यात आली आहेत. त्यात २ हजार २९१ कंट्रोल युनिट; तर ७ हजार १४३ बॅलेट युनिटचा समावेश आहे.