शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
2
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
3
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
5
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
6
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
7
म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?
8
देशातील परिस्थितीवर आलिया भटची इतक्या दिवसांनी पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक वर्दीच्या मागे..."
9
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
10
गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
11
कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
12
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
13
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
14
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
15
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
16
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
17
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
18
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
19
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
20
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट

जादूटोणा कायद्याची देशपातळीवर दखल

By admin | Updated: August 12, 2014 01:05 IST

अंधश्रद्धा, बुवाबाजी, तंत्र-मंत्र, करणी अशा समाज विघातक कृत्यांना गाडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जादूटोणाविरोधी कायदा लागू केला. या कायद्याची इतरही राज्यांनी स्तुती केली असून

विविध राज्यस्तरीय पुरस्कार वितरण : सामाजिक न्यायमंत्र्यांचे प्रतिपादनअमरावती : अंधश्रद्धा, बुवाबाजी, तंत्र-मंत्र, करणी अशा समाज विघातक कृत्यांना गाडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जादूटोणाविरोधी कायदा लागू केला. या कायद्याची इतरही राज्यांनी स्तुती केली असून तो देशपातळीवर लागू करण्याबाबत मंथन सुरू झाल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री शिवाजीराव मोघे यांनी अमरावती येथे केले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने सोमवारी अमरावतीत फुले, शाहू, आंबेडकर पारितोषिक, संत रविदास पुरस्कार व पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार वितरण सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय सावकारे, महापौर वंदना कंगाले, जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे, आ. श्रीकांत देशपांडे, आ. रावसाहेब शेखावत, सामाजिक न्याय विभागाचे सचिव आर.डी. शिंदे, समाजकल्याण आयुक्त रणजितसिंह देओल, समाजकल्याणचे अतिरिक्त आयुक्त एम.एम. आत्राम, अमरावती विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, समाजकल्याणचे अवर सचिव वडते आदी उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना मोघे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या हातात शिष्यवृत्तीची रक्कम पडावी, यासाठी ई-स्कॉलरशिप सुरू करण्यात आली असून विविध सहा विभागांमध्ये ३२.३६ लाख विद्यार्थ्यांची ई-स्कॉलरशिपसाठी नोंदणी करण्यात आली आहे. यामुुळे शिष्यवृत्ती वाटपात यापूर्वी झालेला घोळ आणि प्राप्त होणाऱ्या तक्रारी बंद होतील. झोपडपट्टी निर्मूलनासाठी रमाई आवास योजनेंतर्गत २.२५ लाख घरकुल निर्माण करण्यात आले आहेत. सामाजिक न्याय विभागाची यापूर्वी २७१ वसतिगृहे होती. आता नव्याने १०० वसतिगृहे निर्माण करण्यात आली आहेत. उन्नत गटात न मोडणाऱ्या विमुक्त भटक्या जमाती व इतर मागासवर्गीयांना ६ लाख रूपयांपर्यंतचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र तीन वर्षांपर्यंत ग्राह्य धरले जाणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या सहा महामंडळापैकी अपंग विकास महामंडळाची ९१ टक्के वसुली असून ती कौतुकास्पद असल्याचे मोघे म्हणाले. व्यसनमुक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविले जाणारे धोरण हे सामाजिक न्याय विभागाचे मोठे यश आहे.श जादूटोणा विरोधी कायद्याची स्तुती मार्क्सवादी पक्षाचे प्रकाश करात यांनी केली आहे. हा कायदा देशभरात लागू करण्याबाबत केंद्र शासनही विचाराधीन असल्याचे मोघे म्हणाले. संचालन ज्योती आंबेकर, आभार प्रदर्शन आर.डी. शिंदे यांनी केले. (प्रतिनिधी)