शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या कणाकणांत स्वयंसेवक!-राम नाईक

By admin | Updated: October 23, 2014 04:04 IST

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक होण्याची किंवा त्याचा राजीनामा देण्याची कोणतीही पद्धत नाही. त्यामुळे आज मी उत्तर प्रदेश राज्याचा राज्यपाल असलो

मुंबई : ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक होण्याची किंवा त्याचा राजीनामा देण्याची कोणतीही पद्धत नाही. त्यामुळे आज मी उत्तर प्रदेश राज्याचा राज्यपाल असलो, तरी मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि माझ्या शरीराच्या कणाकणांत स्वयंसेवक भरलेला आहे’, अशा स्पष्ट शब्दांत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी संघासोबतचे आपले संबंध जाहीर केले. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित वार्तालापामध्ये नाईक बोलत होते.राम नाईक म्हणाले की, राज्यपाल होताच भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा आपण राजीनामा दिला होता. त्यामुळे आता आपण कोणत्याही पक्षाचे सदस्य नसून सर्व पक्षांचे अध्यक्ष माझे मित्र आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत संघाच्या १० वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना राजभवनवर जेवणासाठी आमंत्रित केल्याची कबुलीही त्यांनी या वेळी दिली. शिवाय राजकारणात आणि समाजात एक जातीची आणि दुसरी राजकीय अस्पृश्यता पाळली जात आहे. त्यावर आपला विश्वास नसल्याचे स्पष्टीकरणही नाईक यांनी दिले.उत्तर प्रदेशात होत असलेल्या आरोपांचे खंडन करताना ते म्हणाले, ‘मी भाजपाचा एजंट नसून केंद्र व राज्य शासनात सेतू म्हणून काम करत आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी एखाद्या गोष्टीत मला दखल द्यावी लागत असेल, तर मी दखलबाजी करणारच. कारण लोकांच्या समस्यांकडे गंभीरतेने लक्ष देणे सरकारचे काम आहे.’राज्यपाल म्हणजे राजकीय निवृत्ती नाही!राज्यपाल म्हणजे निवडणूक हरलेल्या नेत्यांना राजकारणातून दिलेली निवृत्ती आहे, हा लोकांचा गैरसमज असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘वास्तवात राज्य शासन नियमाच्या चौकटीत राहून काम करते की नाही, यावर लक्ष ठेवण्याचे काम राज्यपालाचे आहे. त्यामुळे घटनेप्रमाणे काम होतेय की नाही, हे पाहण्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून मी करत आहे.’ (प्रतिनिधी)