शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
2
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
3
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
5
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
6
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
7
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
8
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
9
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
10
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
11
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
12
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
13
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
14
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
15
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
16
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
17
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
18
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
19
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
20
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे

नांदेडमधील हस्तरा गावच्या सुपुत्राने घेतली ‘वायु’भरारी! विवेक चौधरी नवे एअर चीफ मार्शल; गावात आनंदीआनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 12:05 IST

विवेक चाैधरी हे देशाचे वायुसेना प्रमुख म्हणून १ ऑक्टाेबरपासून सूत्रे स्वीकारणार आहेत. हस्तरा गावच्या सुपुत्राने घेतलेल्या या गगनभरारीने सर्वांचाच ऊर अभिमानाने भरून आला.

सुनील चाैरे -

हदगाव (नांदेड) : नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील अत्यंत दुर्लक्षित असलेले कयाधू नदीकाठावरील हस्तरा हे गाव दोन दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. या गावातील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या विवेक चौधरी यांची वायुसेना प्रमुखपदी नियुक्ती झाल्याची बातमी कळताच हस्तरा येथील ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला.    विवेक चाैधरी हे देशाचे वायुसेना प्रमुख म्हणून १ ऑक्टाेबरपासून सूत्रे स्वीकारणार आहेत. हस्तरा गावच्या सुपुत्राने घेतलेल्या या गगनभरारीने सर्वांचाच ऊर अभिमानाने भरून आला. गावकऱ्यांनी ‘लाेकमत’ला सांगितले की, विवेक चौधरी यांचे वडील रामभाऊ गणपत चौधरी हे व्यवसायाने अभियंता होते. त्यांनी हैदराबाद येथे एक कंपनी सुरू केली होती, तर आई मुख्याध्यापिका होत्या. विवेक यांचे प्राथमिक शिक्षण हैदराबाद येथे झाले. हस्तरा येेथे त्यांची शेती व घर आहे. त्यांच्या शेतामध्ये ३०० वर्षांपूर्वी रेणुकादेवीचे मंदिर बांधलेले आहे. आजही त्यांची शेती अवधूत शिंदे हे वाहत आहेत. २०१३-१४ मध्ये विवेक चौधरी हे शेती विक्री करण्यासाठी गावात आले होते, अशी आठवण शिंदे यांनी सांगितली. निजामकाळात हस्तरा एक प्रसिद्ध बाजारपेठ होती. उमरखेड, कळमनुरी, बाळापूर येथील व्यवहार हे हस्तरा गावावरच अवलंबून होते. विवेक यांचे काका काशीनाथ हे हार्डवेअरचे मोठे व्यापारी होते.  

विवेक चौधरी यांच्या शेती खरेदी-विक्रीच्या वेळेस मी साक्षीदार होतो. आम्हा गावकऱ्यांना या निवडीचा खूप आनंद झाला आहे. गावात त्यांच्या सत्काराचे नियोजन केले जात आहे.  - संजय चौधरी, चुलत भाऊ, हस्तराअभिमानास्पद गगनभरारीनांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील हस्तरा गावचे भूमिपुत्र विवेक चाैधरी यांनी घेतलेली गगनभरारी अभिमानास्पद आहे. देशाच्या वायुसेना दल प्रमुखपदी त्यांची झालेली नियुक्ती ही गाैरवाची बाब आहे. त्यांनी नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा राेवला आहे.  -अशाेक चव्हाण, पालकमंत्री, नांदेड 

टॅग्स :airforceहवाईदलindian air forceभारतीय हवाई दलNandedनांदेड