शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विठोबा कोणा एकाचं दैवत नाही, तो सर्व समाजाचा; कीर्तनकार मुस्लिम महिलेचे होते अखेरचे उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 08:23 IST

लहानपणापासून केलेल्या विठ्ठलभक्तीने थकलेल्या त्यांच्या देहाने प्रतिसाद दिला नाही. 

राजू इनामदार

पुणे : ‘‘विठोबा कोणा एकाचे दैवत नाही. तो सर्व समाजाचा आहे. त्याची सेवा करण्यात मला आनंद मिळतो. शरीर साथ देत आहे तोपर्यंत मी त्याची सेवा करतच राहणार...” हे उद्गार आहेत ज्येष्ठ कीर्तनकार जैतूनबी यांचे. वय वर्षे ७७ असलेल्या जैतूनबी यांनी ६ जुलै २०१०च्या रात्री कीर्तन केले. त्याच रात्री त्यांची प्राणज्योत मालवली आणि ते कीर्तन त्यांचे अखेरचे ठरले. 

कार्यक्रमाचे स्थळ होते पुण्यातील रामोशी गेट पोलिस चौकी. काळ होता पंढरीच्या वारीचा आणि वेळ होती रात्रीची. उपस्थित वारकऱ्यांनी त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लहानपणापासून केलेल्या विठ्ठलभक्तीने थकलेल्या त्यांच्या देहाने प्रतिसाद दिला नाही. 

५व्या वर्षी वारकरी संप्रदायाची दीक्षा

माळेगाव (ता. बारामती) या आपल्या मूळच्या गावातून नेहमीप्रमाणे त्या गावातील दिंडीबरोबर पुण्यात आल्या होत्या. वयाच्या ५व्या वर्षी त्यांना माळेगावमधील हनुमानदास महाराज यांनी वारकरी संप्रदायाची दीक्षा दिली. त्यांचे वडील मकबूलभाई सय्यद हे गवंडी काम करत. संध्याकाळी दमलेल्या शरीराला विसावा म्हणून हनुमान महाराज यांच्या भजनाला जाऊन बसत. बरोबर लहानगी जैतूनबी असे. दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. आजन्म ब्रह्मचारी व व्रतस्थ राहिल्या. विठ्ठलभक्ती हाच त्यांचा अखेरपर्यंतचा ध्यास होता.जैतूनबी यांना प्रत्यक्ष पाहिलेले, त्यांच्याबरोबर बोललेले ८७ वर्षीय नंदकुमार लांडगे सांगत होते. संत गाडगे महाराज ज्याप्रमाणे प्रश्नोत्तरे घेत कीर्तन करत, त्याप्रमाणे जैतूनबी  कीर्तन करत. त्या श्रोत्यांना प्रश्न करत, त्यांच्याकडून उत्तरे घेत. 

 

टॅग्स :Pandharpurपंढरपूर