शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

व्हिजिट महाराष्ट्र : पर्यटन वर्षाचा दिल्लीत शुभारंभ

By admin | Updated: January 31, 2016 00:32 IST

महाराष्ट्र सरकारने २0१६-१७ ‘व्हिजिट महाराष्ट्र’ म्हणून साजरे करण्याचे ठरवले आहे. समस्त दिल्लीकर जनतेने व देशातील पर्यटकांनी गड, किल्ले, समुद्र किनारे, पर्यटन स्थळे पाहण्यासाठी

नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारने २0१६-१७ ‘व्हिजिट महाराष्ट्र’ म्हणून साजरे करण्याचे ठरवले आहे. समस्त दिल्लीकर जनतेने व देशातील पर्यटकांनी गड, किल्ले, समुद्र किनारे, पर्यटन स्थळे पाहण्यासाठी या वर्षात महाराष्ट्राला अवश्य भेट द्यावी, असे खुले निमंत्रण दिल्ली हाट येथील महाजत्रा महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. त्यांच्या हस्ते ‘व्हिजिट महाराष्ट्र’ वर्षाचा अधिकृत शुभारंभ झाला.महाराष्ट्राची हस्तकला, लघु उद्योग, कुटीराद्योग व मराठी संस्कृतीच्या महतीचे दर्शन घडवणारा महाराष्ट्र ‘महाजत्रा’ महोत्सव १५ दिवसांपासून दिल्ली हाट येथे सुरू होता. शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते त्याच समारोप झाला. देशातील अग्रणी राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. दिल्लीत महाजत्रा महोत्सवाचे आयोजन करून राज्याच्या विविध भागांतील हस्तकला, लघु व कुटीरोद्योग तसेच वैविध्यपूर्ण लोकसंस्कृतीचे दर्शन दिल्लीकरांना व अन्य पर्यटकांना झाले, याबद्दल सरकारच्या विविध विभागांचे कौतुक केले. पुरणपोळीचे मार्केटिंग करणारमहाराष्ट्राची पुरणपोळी, वडापाव व अन्य लोकप्रिय खाद्यपदार्थांचे जगभर मार्केटिंग करू, असा संकल्प व्यक्त करीत राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या सचिव वळसा नायर म्हणाल्या, दिल्ली हाटच्या महाजत्रेला दिल्लीसह देश विदेशातल्या पर्यटकांचा अपूर्व प्रतिसाद मिळाला. या सोहळयात कलादिग्दर्शक नितीन देसाई, पैठणीचा प्रसार आणि प्रचार करणारे राजपूत, सुती वॉल हँगिंग्ज बनवणारे जीतेंद्र राजपूत, राजेंद्र अनकम, अरोमा थेरपीच्या पुरस्कर्त्या विजया, पर्यटकांना महाराष्ट्राच्या खाद्यपदार्थांची ओळख करून देणाऱ्या शुभांगी चिपळूणकर, प्रदर्शनातील अन्य प्रतिनिधी व मुंबईतील सांस्कृतिक कार्यक्रमाचे पथक प्रमुख आदींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (लोकमत न्यूज नेटवर्क)