शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
5
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
6
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
7
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
8
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
9
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
10
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
11
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
12
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
13
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
14
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
15
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
16
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
17
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
18
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
19
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
20
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक

परीक्षेवर भरारी पथकाची नजर

By admin | Updated: February 28, 2017 02:37 IST

महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे

प्राची सोनवणे,नवी मुंबई- महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. ठाणे, मुंबई, रायगड विभागातील ५५७ केंद्रांवर ३ लाख ४० हजार ४०८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. नियोजित परीक्षा केंद्रांवर कसलाही गैरप्रकार घडू नये, याकरिता दक्षता समितीसह भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, तसेच निरंतर शिक्षणाधिकारी आणि बोर्डाच्या पथकाचा समावेश करण्यात आला आहे.मंगळवारी ११ ते २ या वेळेत इंग्रजीचा पहिला पेपर होणार आहे. परीक्षा कालावधीत कोणताही गैरप्रकार घडू नये याकरिता प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. बारावीची परीक्षा सुरळीतपणे पार पडण्यासाठी केंद्र प्रमुख, अतिरिक्त केंद्र प्रमुख तसेच परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी देखील बोर्डाचे कामकाज सुरू असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. रविवारी पोलीस संरक्षणासह १४ गाड्यांमधून ठाणे, पालघर, रायगड केंद्रावर परीक्षेचे गोपनीय साहित्य पोहोचविण्यात आले तर सोमवारी १३ गाड्यांमधून मुंबई विभागातील सर्व केंद्रावर साहित्य सुरक्षितरीत्या पोहोचविण्यात आले. यावेळी केंद्रसंचालक तसेच परीरक्षकांना परीक्षा नियमांचे पालन, घ्यावयाची काळजी याविषयी सूचना करण्यात आल्या. परीक्षा केंद्रावर केंद्र संचालकांशिवाय कोणालाही मोबाइलचा वापर करता येणार नसून, मोबाइल जमा करावे लागतील.>आसनव्यवस्थेची खात्री करागतवर्षीच्या तुलनेत यावर्षी विद्यार्थी संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडल्याने परीक्षा केंद्र आणि विद्यार्थी संख्येचे गणित अचूक जमविणे अडचणीचे ठरले. विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत व्हावी यादृष्टीने नजीकचे केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र काही केंद्रावर पुरेशी आसन व्यवस्था नसल्याने शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने शेजारील इमारतीमध्ये विद्यार्थ्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली. विद्यार्थी तसेच पालकांनी गोंधळून न जाता वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचण्याची सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सहसचिव सुभाष बोरसे यांनी केली आहे. शेजारील इमारतीत बैठक व्यवस्था करण्यात आलेल्या केंद्रांना फलक लावण्याच्या सूचना करण्यात आल्याचेही बोरसे यांनी सांगितले.<शेवटच्या क्षणी ७१ अर्जगेल्या वर्षी परीक्षेत अयशस्वी ठरलेल्या, विषय न सुटलेल्या विद्यार्थ्यांना आदल्या दिवसापर्यंत परीक्षा अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली होती. या संधीचा लाभ घेत ७३६ विद्यार्थ्यांनी दंडात्मक रक्कम भरून मुदतीनंतर अर्ज भरल्याची माहिती राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामध्ये रिपिटर्स, श्रेणीसुधार तसेच तुरळक विषय घेऊन बसलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश असणार असून अतिविलंब, अतिविशेष, परीक्षा फी वसूल करून परीक्षेला बसण्याची संधी देण्यात आली असून या विद्यार्थ्यांना त्वरित हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात आले.