शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

कोल्हापुरात ‘झाडांची भिशी’!, ग्रीन व्हिजन व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 05:12 IST

भिशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते ठरावीक व्यक्तींमध्ये होणारे छोट्या स्वरूपातील आर्थिक व्यवहार. मात्र, कोल्हापुरातील ग्रीन व्हिजन व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या सदस्यांनी ‘झाडांची भिशी’ सुरू करून गेल्या चार महिन्यांत शहरातील विविध ठिकाणी सुमारे चारशे झाडे लावली आहेत.

संतोष मिठारी कोल्हापूर : भिशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते ठरावीक व्यक्तींमध्ये होणारे छोट्या स्वरूपातील आर्थिक व्यवहार. मात्र, कोल्हापुरातील ग्रीन व्हिजन व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या सदस्यांनी ‘झाडांची भिशी’ सुरू करून गेल्या चार महिन्यांत शहरातील विविध ठिकाणी सुमारे चारशे झाडे लावली आहेत.शहरातील डॉक्टर, हॉटेल व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी आणि काही सामाजिक संस्थांचे प्रमुख अशा ४५ जणांचा ग्रीन व्हिजन व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप व्यावसायिक अवनिश जैन यांनी सुरू केला. या ग्रुपसमोर जैन यांनी ‘झाडांची भिशी’ या उपक्रमाची संकल्पना मांडली. त्याला सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. जूनमध्ये या ग्रुपने उपक्रमाची प्रत्यक्षात सुरुवात केली. यानंतर आतापर्यंत शहरातील राजाराम महाविद्यालय ते सायबर चौक, जिल्हाधिकारी कार्यालय ते धैर्यप्रसाद हॉल, विक्रम हायस्कूल व डॉ. झाकीर हुसेन शाळेचा परिसर, आदी ठिकाणी सुमारे चारशे झाडे लावली आहेत. आॅक्टोबरअखेर पाच हजार झाडे लावण्याचा संकल्प आहे.>अशी आहे भिशीची संकल्पनादरमहा विशिष्ट रक्कम या ग्रुपच्या प्रमुखांकडे सदस्य जमा करतात. महिनाअखेरीस भिशीचे सदस्य एकत्र येतात. या वेळी चिठ्ठी टाकून दोन भाग्यवान सदस्यांना भिशीची रक्कम प्रदान करण्यात येते. हे सदस्य या रकमेतून रोपे आणि ट्री-गार्ड खरेदी करतात. शिवाय त्यांनीसुचविलेल्या ठिकाणी सर्व सदस्य एकत्रितपणे वृक्षारोपण करतात. देखभालीची जबाबदारीही या सदस्यांची असते आणि त्याचा वेळोवेळी आढावा घेतला जातो.>वृक्षारोपणासह देखभालहीकाही महिन्यांपूर्वी सोलापूरमधील एक व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप पर्यावरण रक्षणासाठी या भिशीच्या पद्धतीने वृक्षारोपण करीत असल्याचे वाचनात आले. त्यावरुन ही कल्पना सुचली. केवळ रोपे लावली म्हणजे काम झाले असे नाही, तर ती जगविणे महत्त्वाचे असते. त्यामुळे आम्ही लावलेल्या झाडांची देखभालही करतो.- अवनीश जैन, प्रमुख, ग्रीन व्हिजन ग्रुप