शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास पाटलांवर गुन्हा नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 05:22 IST

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) व मुंबई उपनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी विश्वास पाटील तसेच त्यांची पत्नी चंद्रसेना यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचा आदेश विशेष लाचलुचपत प्रतिबंधक विभाग न्यायालयाने एसीबीला दिला आहे.

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) व मुंबई उपनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी विश्वास पाटील तसेच त्यांची पत्नी चंद्रसेना यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचा आदेश विशेष लाचलुचपत प्रतिबंधक विभाग न्यायालयाने एसीबीला दिला आहे. ‘झोपू’ योजनेत नियमबाह्य पद्धतीने विकासकांना मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी असताना ‘पानीपत’कार विश्वास पाटील यांनी मालाड येथील ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पा’त (एसआरए) खासगी विकासकाचा फायदा होईल, अशा पद्धतीने सरकारी जमीन वापरण्याचा अधिकार विकासकांना दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पाटील यांच्यावर गुन्हा नोंदविण्यासाठी सरकारकडून मंजुरी घेण्याची आवश्यकता नसल्याचे विशेष न्यायालयाने स्पष्ट केले.विशेष एसीबी न्यायालयाने विश्वास पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी चंद्रसेना पाटील, विकासक रामजी शहा व रासेश कनाकिया यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा आदेश एसीबीला दिला. तसेच या प्रकरणाचा तपास दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देशही एसीबीला दिले. मालाड येथे गाळा मिळालेल्या हितेंद्र यादव यांनी आॅगस्ट २०१६ मध्ये विश्वास पाटील, चंद्रसेना पाटील व अन्य दोन विकासकांविरुद्ध एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. मात्र दखल न घेतल्याने यादव यांनी विशेष न्यायालयात तक्रार केली.काय आहे प्रकरण?मालाड येथील ‘एसआरए’ प्रकल्पासाठी असलेल्या भूखंडाचे दोन भाग करण्यात आले. त्यातील एक भाग झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याकरिता इमारतीसाठी तर दुसरा भाग खासगी विकासकाला हस्तांतरित केला. पुनर्विकासासह खासगी विकासाला एकूण तीन चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्यात आला. तीनपैकी निम्मा ‘एफएसआय’ हा ‘एसआरए’साठी व निम्मा खुल्या विक्रीच्या इमारतीसाठी देणे बंधनकारक होते.मात्र पाटील यांनी खासगी विकासकांना झुकते माप देत ११,३४० चौरस मीटरऐवजी १६,४४१ चौरस मीटर जागा खुल्या विक्रीच्या बांधकामाला दिली. पाटील यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी विकासक रामजी शहा यांनी त्यांच्या कंपनीत पाटील यांच्या पत्नी चंद्रसेना पाटील यांची संचालकपदी नियुक्ती केली. याबाबत हितेंद्र यादव यांनी तक्रार दाखल केली होती.