शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळेबाज विशाल फटेला अटक; कुटुंबासह आत्महत्येचा विचार येत असल्याचा यू ट्युबद्वारे दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 10:23 IST

सोमवारी सायंकाळी विशाल फटे सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालयात शरण आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, वैद्यकीय तपासणीसाठी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोलापूर : बार्शी येथील कोट्यवधींच्या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी मुख्य सूत्रधार विशाल फटे याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून, मंगळवारी त्याला बार्शी न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक (सोलापूर ग्रामीण) तेजस्वी सातपुते यांनी दिली.सोमवारी सायंकाळी विशाल फटे सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालयात शरण आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, वैद्यकीय तपासणीसाठी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरण येताना तो एकटाच होता, त्याची मुले आणि पत्नी सोबत नसल्याचेही सांगण्यात आले.तत्पूर्वी सकाळी यू ट्युबवरून आपण सायंकाळी पोलिसांसमोर हजर राहणार असल्याचे विशाल फटे याने सांगितले होते.  मागील दोन दिवसांत बायको, मुलासह आत्महत्येचा विचार आला होता. आपण समर्पण करणार असून, मिळेल ती शिक्षा भोगण्यास तयार असल्याचे त्याने म्हटले हाेते.हा २०० कोटींचा घोटाळा नसून जास्तीत जास्त १० कोटी रुपये मला लोकांचे द्यायचे आहेत. मला कुणाचे पैसे बुडवायचे नव्हते आणि नाहीत. आपण सर्वांचे पैसे देणार आहोत.    - विशाल फटे, आरोपी