शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीची अत्याचार करून हत्या, आरोपीला पत्नीनेही दिली साथ,दोघेही अटकेत

By प्रशांत माने | Updated: December 25, 2024 18:01 IST

Kalyan Minor Rape & Murder Case: पूर्वेकडील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तीची हत्या करणारा नराधम विशाल गवळीला शेगाव येथे पोलिसांनी बेडया ठोकल्या. या गुन्हयात साथ देणारी त्याची पत्नी साक्षी हिला देखील अटक केली आहे.

- प्रशांत मानेकल्याण - पूर्वेकडील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तीची हत्या करणारा नराधम विशाल गवळीला शेगाव येथे पोलिसांनी बेडया ठोकल्या. या गुन्हयात साथ देणारी त्याची पत्नी साक्षी हिला देखील अटक केली आहे. आरोपीच्या घराबाहेर पडलेल्या रक्ताच्या डागांवरून त्याने मुलीची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

कोळसेवाडी पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशीरा मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान मंगळवारी भिवंडी नजीकच्या बापगाव परिसरात एका लहान मुलीचा मृतदेह आढळला. चौकशीत तो कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या मुलीचाच असल्याचे समोर आले. दरम्यान मुलीच्या घराच्या परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता एका ठिकाणी मुलगी जाताना दिसली पण पुन्हा येताना दिसली नाही. त्याठिकाणी तपास केला असता एका घराच्या परिसरात रक्ताचे डाग पडलेले असल्याने तेथे राहणा-या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विशाल गवळीवर पोलिसांचा संशय बळावला. तो घरी आढळुन आला नाही, पोलिसांनी त्याची पत्नी साक्षीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने विशालने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तीची हत्या केल्याची कबुली दिली. 

पत्नी साक्षीकडून धक्कादायकमाहीती उघडसोमवारी संध्याकाळी पाच वाजता रहात्या घरी विशालने त्या मुलीसोबत गैरकृत्य करून तीची हत्या केली. तिचा मृतदेह मोठया बॅगेत लपविला. सात वाजता बँकेत काम करणारी त्याची पत्नी साक्षी घरी आली असता तिला घडलेला प्रकार विशालने सांगितला. हे ऐकल्यावर तिला धक्काच बसला. दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे ठरविले. आधी घरात पडलेले रक्त पुसून टाकले आणि रात्री साडेआठला मित्राची रिक्षा बोलावून घेतली. रात्री नऊ वाजता स्वत: रिक्षा चालवित विशाल पत्नीसह मृतदेह असलेली बॅग घेऊन बापगावला गेला. त्याठिकाणी मृतदेह फेकून दोघे घरी परतत असताना विशालने आधारवाडी चौकात दारूची बाटली विकत घेतली आणि तेथूनच तो पत्नी साक्षीच्या गावी शेगाव येथे निघून गेला. तर साक्षी घरी परतली. पोलिसांनी साक्षीची चौकशी केल्यावर तिने हा सर्व उलगडा केला.

विशाल विकृत मनोवृतीचाविशालला या गुन्हयात साथ देणारी साक्षी ही त्याची तिसरी पत्नी आहे. त्याच्या दोन बायका त्याला सोडून गेल्या आहेत. विशालवर यापूर्वी विनयभंग, जबरी चोरी, मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला तडीपारीची शिक्षा देखील झाली आहे. तो जामिनावर बाहेर आला आहे. दरम्यान त्याने अल्पवयीन मुलीबरोबर केलेले कृत्य पाहता तो विकृत मनोवृतीचा असल्याचे समोर आले आहे.

दाढी काढून पेहराव बदललाविशालला दाढी होती. परंतू आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्याने शेगाव याठिकाणच्या सलुनमध्ये दाढी काढून टाकली. त्यानंतर तो पेहराव बदलून सलूनमधून बाहेर पडत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारीArrestअटक