शहरं
Join us  
Trending Stories
1
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
2
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
3
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
4
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
5
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
6
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
7
'ब्लड मनी' घेण्यास तलालच्या कुटुंबाने दिला नकार! येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर?
8
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...
9
Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
10
भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?
11
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
12
Guru Purnima 2025: स्वामी समर्थांची 'ही' एक शिकवण बदलून टाकेल आपले आयुष्य!
13
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
14
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
15
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
16
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
17
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."
18
"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद
19
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
20
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 

कौमार्य सिद्ध न झाल्याने वधूला माहेरी पाठविले!

By admin | Updated: June 2, 2016 02:38 IST

लग्नानंतर जातपंचायतीने घेतलेल्या कौमार्याच्या कथित चाचणीत नववधू दोषी आढळली, असा ठपका ठेवत जातपंचायतीने लग्न रद्द ठरविल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील

संगमनेर/नाशिक : लग्नानंतर जातपंचायतीने घेतलेल्या कौमार्याच्या कथित चाचणीत नववधू दोषी आढळली, असा ठपका ठेवत जातपंचायतीने लग्न रद्द ठरविल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील (अहमदनगर) घुलेवाडी येथील वधूबाबत घडला. मात्र ‘अंनिस’चा पाठपुरावा व प्रसारमाध्यमांच्या दणक्यामुळे बुधवारी वधूचा स्वीकार करत तिचा पती व सासरच्या मंडळींनी तिला पुन्हा नांदण्यासाठी नेले.घुलेवाडीतील एका तरुणीचा २२ मे रोजी नाशिकच्या तरुणाशी विवाह झाला. विवाहानंतर दुसऱ्या दिवशी वधूच्या माहेरीच जात पंचायतीने तिच्या कौमार्याची कथित चाचणी घेतली. त्यात वराने व जातपंचायतीने तिला दोषी ठरवत तिचा स्वीकार करण्यास नकार दिला. लग्न रद्द ठरवून वधूला माहेरीच सोडून वऱ्हाडी परतले. मुलाच्या कुटुंबीयांनी वधूच्या अंगावरील सोनेही काढून घेतले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) जिल्हा कार्याध्यक्षा अ‍ॅड. रंजना गवांदे यांना हे प्रकरण समजले. त्यांनी तातडीने नववधूची भेट घेवून हा प्रश्न जात पंचायत विरोधी समितीचे कृष्णा चांदगुडे यांच्या मदतीने ऐरणीवर आणला. या विषयीचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये येताच जात पंचायतीवर टीकेची झोड उठली.महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीने पोलीस उपमहानिरीक्षकांना कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर बुधवारी सकाळी पोलीस उपअधीक्षक डॉ. अजय देवरे, पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे व अ‍ॅड. गवांदे यांनी विवाहितेच्या घरी भेट देऊन वास्तव जाणून घेतले. पोलिसांनी तिला धीर देत नवरदेवाशी संपर्क साधून त्याला संगमनेरला बोलाविले. त्यानुसार पाच वाजता नवरदेव घुलेवाडीत आला. विवाहितेच्या घरात नातेवाईकांची बैठक होऊन त्याने गैरसमजातून झालेल्या घटनेची माफी मागत पत्नीस नांदायला नेण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला. अखेर पोलीस बंदोबस्तात नववधू सासरी रवाना झाली. (प्रतिनिधी) च्लग्नानंतर पंचांनी एक पांढरेशुभ्र वस्त्र नवदाम्पत्याला देऊन मंडपाशेजारच्या खोलीत जाण्यास सांगितले. काही वेळेनंतर जात पंचायत बसली. पंचांनी विचारणा केल्यावर नवऱ्या मुलाने सर्वांसक्षम आत घडलेल्या प्रसंगाचे हुबेहूब वर्णन केले. पंचांनी एक धक्कादायक प्रश्न विचारला, ‘माल खरा निघाला की खोटा?’ त्यावर नवऱ्या मुलाने हातातील पांढरे वस्त्र पंचांकडे दिले. पंचांनी ते बघितले. त्यावर रक्ताचा डाग नव्हता. तेवढ्यातच मुलाने ‘माल खोटा..खोटा.. खोटा’ असे म्हटले. या वाक्याने सगळीकडे शांतता पसरली. वधूपित्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलीने आक्रोश करून मी पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत असल्याने असे घडले असेल, असे जीव तोडून सांगितले. वडिलांनीदेखील सगळ्यांना विनवणी केली. मात्र पंचांनी हेका सोडला नाही.घडलेल्या प्रकरणाबाबत वधू आणि वर पक्षात आपसात समझोता झालेला आहे. त्यांची या प्रकरणाविषयी कुठलीही तक्रार नाही. दोघांचे तसे जबाब पोलीस डायरीला नोंदवून घेतले आहेत. - गोविंद ओमासे, पोलीस निरीक्षकवधू-वर पक्षातील लोकांची बैठक झाली. आपणावरील दबावामुळे हा प्रकार घडल्याचे नवऱ्या मुलाने सांगितले. वधूला नांदविण्यास सासरची मंडळी तयार असल्याने आपसातील चर्चेतून हे प्रकरण तडीस लागले आहे. जातपंचायतींनी अशा अघोऱ्या व अशास्त्रीय प्रथा थांबविण्याची गरज आहे. - अ‍ॅड. रंजना गवांदे, कार्याध्यक्षा अंनिस