शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

CAA Protest: मराठवाड्यामध्येही हिंसक वळण; जाळपोळीच्या घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 06:34 IST

अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि बीडमध्ये पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलनाची धार राज्यातही तीव्र झाली असून शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी ठिकठिकाणी निघालेल्या मोर्चांनी महाराष्ट्र दणाणून गेला. मराठवाड्यात बीड, परभणी, हिंगोली येथे आंदोलनाला हिंसक वळण लागले.

अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि बीडमध्ये पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. औरंगाबाद आणि नांदेडमध्ये मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात शांततेत आंदोलन झाले. आंदोलनासाठी नागरिक उस्फूर्तपणे रस्त्यावर उतरले होते. त्यातही तरुणांची संख्या लक्षवेधी होती.

औरंगाबादेत विविध मुस्लीम आणि दलित संघटनांनी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरत एल्गार पुकारला. या मोर्चात अक्षरश: जनसागर उसळला होता. शहरात कडकडीत बंद होता. बीडमध्ये मोर्चेकऱ्यांनी बसवर दगडफेक केल्याने पोलिसानी अश्रूधुराच्या ४ नळकांड्या फोडल्या. यात ८ ते १० पोलीस आणि होमगार्ड जखमी झाले.

कळमनुरी येथे ४ एसटी बसेस फोडल्या. यामध्ये दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. दुपारी नवीन बसस्थानकासमोर मोठा जमाव जमल्याने पोलिसांनी लाठीमार केला. अश्रूधुराचे नळकांडेही फोडले. त्यानंतर जमाव पांगला गेला. दिवसभर शहरात कडकडीत बंद होता. परभणीसह जिल्ह्यात पाथरी, पूर्णा, पालम येथे मोर्चा काढण्यात आला. परभणी शहरात मोर्चेकरी परतत असताना काही जणांनी मनपाच्या अग्नीशन दलाच्या गाडीवर (पान १२ वर) दगडफेक केली. दुचाकी वाहनांचेही नुकसान केले.

नांदेडात सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले़ हजारोंच्या संख्येने नागरिकांनी तब्बल सव्वातीन तास जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ठाण मांडले होते़ लातूर जिल्ह्यातील निलंगा, औराद शहाजानी आणि किनगाव येथ मोर्चा काढण्यात आला़ निलंगा येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, मिरज, सोलापूर, फलटण येथे आंदोलन झाले. मिरजेत संविधान बचाव कृती समितीतर्फे प्रांताधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. मुस्लिम कार्यकर्ते उस्फुर्तपणे हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. कोल्हापूरात बहुजन क्रांती मोर्चासह विविध संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पुण्यात निघालेल्या मोर्चात आंदोलकांनी ‘भारत में हम किराएदार नहीं बराबर के हिस्सेदार हैं !, ‘सेव्ह कॉन्स्टिट्यूशन रिजेक्ट कॅब’ असे लिहिलेले फलक हातात धरले होते.

अहमदनगर शहर, संगमनेर, राहाता, कोपरगाव, जामखेड शहरात संविधान बचाओ मोर्चा काढण्यात आला. खान्देशात जळगाव, भुसावळ, अमळनेर, जामनेर, धुळे व शहाद्यात मोर्चे काढण्यात आले. रायगड जिल्ह्यात पनवेल आणि मानगाव येथे तर ठाणे जिल्ह्यात भिवंडीतही आंदोलन झाले.नाागपुरातही प्रचंड मोर्चामुस्लीम समाजाचा लक्षवेधी रोष नागपुरकरांनी अनुभवला. हिवाळी अधिवेशनानिमित्त सरकार नागपुरात असताना आंदोलनासाठी प्रचंड मोठ्या संख्येने मुस्लीम समाज रस्त्यावर उतरला. मुस्लीम समाजाची ही वज्रमुठ सरकारसाठी एक ईशारा असल्याची भावना मोर्चेकºयांनी व्यक्त केली.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक