शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

ट्रू कॉलरने डेटा गोपनीयतेचा भंग केल्याचा जनहित याचिकेद्वारे दावा, राज्य, केंद्र सरकारला उच्च न्यायालयाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 11:50 IST

ट्रू कॉलर हे ॲप वापरकर्त्याची माहिती संकलित करते आणि ही माहिती ॲप वापरकर्त्यांची परवानगी न घेता त्यांच्या भागीदार कंपन्यांना देते, असा आरोप शशांक पोस्तुरे यांनी जनहित याचिकेद्वारे केला आहे. याची सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. (True Caller)

मुंबई : ट्रू कॉलर (True Caller) या मोबाइल ॲपने हे ॲप वापरकर्त्यांची माहिती अन्य खासगी कंपन्यांना देऊन देशातील कायदेशीर तरतुदींचा भंग केला आहे, असा दावा जनहित याचिकेद्वारे करण्यात आला आहे. या याचिकेवर उत्तर देण्यासाठी उच्च न्यायालयानेराज्य सरकार वकेंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.ट्रू कॉलर हे ॲप वापरकर्त्याची माहिती संकलित करते आणि ही माहिती ॲप वापरकर्त्यांची परवानगी न घेता त्यांच्या भागीदार कंपन्यांना देते, असा आरोप शशांक पोस्तुरे यांनी जनहित याचिकेद्वारे केला आहे. याची सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.ट्रू कॉलर हे वापरकर्त्यांचे एकप्रकारे शोषण करीत आहे. कारण वापरकर्त्यांना अन्य दुसरा पर्याय नाही, असे याचिकेत म्हटले आहे. याचा लाभ कोणत्या कंपन्यांना मिळतो, अशी विचारणा न्यायालयाने याचिककर्त्यांकडे केली. गुगल इंडिया, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक आणि अनेक कर्ज देणाऱ्या कंपन्यांना ही माहिती पुरविली जाते, असे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले.आपण राज्य सरकार, केंद्र सरकार, राज्य आयटी विभाग, ट्रू कॉलर इंटरनॅशनल एलएलपी, आयसीआयसीआय बँक आणि नॅशनल पेमेंट काॅर्पोरेशनला प्रतिवादी केले असल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले.

तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देशकेंद्र सरकारने नीट छाननी न करताच या ॲपला परवानगी दिली आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. ‘ट्रू कॉलर हे मोबाइल ॲपद्वारे नागरिकांची गोपनीय माहिती त्यांच्या परवानगीशिवाय अन्य कंपन्यांना पुरविते. त्यामुळे प्रतिवाद्यांना नोटीस बजावणे योग्य आहे, असे आम्हाला वाटते, असे म्हणत न्यायालयाने सर्व प्रतिवाद्यांना नोटीसवर तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार