शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शहरांपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार

By admin | Updated: January 22, 2015 02:06 IST

राज्यातील शहरी शाळांमधील विद्यार्थ्यांचे मराठी आणि गणित विषयांमधील ज्ञान ग्रामीण विद्यार्थ्यांपेक्षा कमी आहे. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

पुणे : ग्रामीण भागातील शाळांपेक्षा शहरी भागातील शाळांची गुणवत्ता अधिक चांगली असते, असा गवगवा केला जात असला तरी राज्यातील शहरी शाळांमधील विद्यार्थ्यांचे मराठी आणि गणित विषयांमधील ज्ञान ग्रामीण विद्यार्थ्यांपेक्षा कमी आहे. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील एकूण २ हजार २९३७ शाळांमधील पाचवीच्या विद्यार्थ्यांचे मराठी व गणित विषयातील ज्ञानाचे मूल्यमापन करण्यात आले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील ८१ शाळांमधील विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे ४४ वस्तुनिष्ठ प्रश्न विचारण्यात आले. हे प्रश्न श्रवण, वाचन, शब्दसंपत्ती, कार्यात्मक व्याकरण, लेखन यावर आधारित होते. तर गणित विषयातील ५० वस्तुनिष्ठ प्रश्न हे संख्यात्मक, अपूर्णांक, संख्यावरील क्रिया, अपूर्णांकावलील क्रिया, मापन, व्यवहारिक गणित, भूमितीवर आधरित होते.या प्रश्नांना विद्यार्थ्यांना दिलेल्या उत्तरांच्या आधारावरून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातही मराठी विषयामध्ये ग्रामीण भागातील मुलांपेक्षा मुलीच अधिक हुशार असल्याचे निदर्शनास आले आहे. यंदा प्रथमच विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेची प्रमाणीत चाचणी एससीईआरटीतर्फे करण्यात आली. या अहवालाची माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.च्मराठीच्या चाचणीत २१ ते ५० गुण मिळविणाऱ्यांची टक्केवारी ७१.५७ टक्के आहे. तर गणिताच्या चाचणीमध्ये २१ ते ५० गुण मिळविणाऱ्यांची टक्केवारी ६३.७४ टक्के आहे. ० ते २० गुण मिळविणाऱ्या विद्यार्थांची संख्या २८.४२ आहे.च्एससीईआरटीने जातीनिहाय सर्वेक्षण केले असून त्यात अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय वर्ग आणि खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांची सुद्धा वेगळी नोंद या अहवालात आहे. त्यात भटक्या जमातीमधील विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालकांकडून घरी अभ्यासात मदत मिळत असलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी ७३.३२ टक्के आहे.