शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता दुुरुस्तीप्रकरणी ग्रामस्थांनी मतदानावर टाकला बहिष्कार

By admin | Updated: February 21, 2017 20:40 IST

ढवळी (ता. मिरज) येथील ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्तीसाठी मतदानावरील बहिष्कार कायम ठेवल्याने मतदान केंद्रावर दिवसभर शुकशुकाट होता.

ऑनलाइन लोकमतनरवाड : ढवळी (ता. मिरज) येथील ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्तीसाठी मतदानावरील बहिष्कार कायम ठेवल्याने मतदान केंद्रावर दिवसभर शुकशुकाट होता. ढवळी गाव समडोळी जिल्हा परिषद गटात येते. मात्र मंगळवारी (दि. २१) ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने मतदान केंद्रावर दिवसभर स्मशानशांतता होती. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत तीन मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती.

यासाठी प्रत्येकी सात कर्मचारी मिळून पोलिस कर्मचाऱ्यांसह २१ कर्मचारी कार्यरत होते. ढवळीत २४४४ मतदार असून, मंगळवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी केवळ चौघांचे मतदान झाले. गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांनी ग्रामस्थांनामतदानाचे आवाहन केले. मात्र ममतदारांनी रस्ता दुरुस्तीच्या निर्णयावर ठाम राहून मतदान केले नाही. मतदानादिवशी गाव पूर्णपणे बंद ठेवल्याने उपस्थित मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची पंचाईत झाली. महसूल विभागाला ढवळीच्या वाळू उपशापोटी वर्षाला सात कोटी रुपये महसूल प्राप्त होतो. मात्र वड्डी ते ढवळी हा चार किलोमीटरचा रस्ता दुरूस्त करण्यास शासन टाळाटाळ करीत आहे.

त्यामुळे २ आॅक्टोबररोजी ग्रामसभेत सरपंच सौ. अश्विनी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्ता दुरूस्तीच्या कारणास्तव मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला ग्रामस्थांनीही मंजुरी दिल्याने बहिष्काराचा निर्णय कायम ठेवण्यात आला.३० डिसेंबररोजी ढवळीच्या ग्रामस्थांनी मिरज-बेळगाव रास्ता रोको केला होता. मात्र त्याचाही परिणाम शासनावर झाला नसल्याने अखेर मंगळवारी नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला.