शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

"UPSC चे अध्यक्ष मनोज सोनी यांच्या राजीनामा प्रकरणाची चौकशी करा’’, विजय वडेट्टीवार यांची मागणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 15:52 IST

Vijay Wadettiwar News: पूजा खेडकर यांची नियुक्ती रद्द होण्याची प्रक्रिया सुरू असताना अचानक यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांच्या राजीनाम्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाच वर्ष शिल्लक असताना सोनी यांनी अचानक राजीनामा का दिला? हा प्रश्न जनतेला पडला आहे.

मुंबई - देशातील अधिकारी घडवणारी, त्यांची परीक्षा घेणारी संस्था म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग. पण पूजा खेडकर प्रकरणामुळे या आयोगावर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे. पूजा खेडकर यांची नियुक्ती रद्द होण्याची प्रक्रिया सुरू असताना अचानक यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांच्या राजीनाम्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाच वर्ष शिल्लक असताना सोनी यांनी अचानक राजीनामा का दिला? हा प्रश्न जनतेला पडला आहे. त्यामुळे सत्य बाहेर येण्यासाठी पूजा खेडकर प्रकरणी मनोज सोनी यांची चौकशी झाली पाहीजे, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रचितगड या  शासकीय निवासस्थानी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार यांनी सोनी आणि यूपीएससी, नीट घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली. यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले कि, सन २०२३ मध्ये मनोज सोनी यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गुजरात-बडोदा येथील विद्यापीठात सगळ्यात तरुण कुलगुरू म्हणून सोनी यांची नियुक्ती केली होती. तेव्हाही त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला होता.  

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आधीच म्हटले होते की, भाजपने घटनात्मक संस्थांवर कब्जा करून त्याचे नुकसान केले आहे. पूजा खेडकर प्रकरण असो किंवा नीटचा निकाल असो हे निकाल घोषित झाल्यावर भयानक चित्र उभे राहत आहे. वर्षानुवर्ष या परीक्षांसाठी मेहनत घेणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे. केंद्रीय संस्थेवर आज प्रश्न उपस्थित होत आहे ते केंद्रातील भाजप सरकारमुळे हे आता स्पष्ट आहे.

मनोज सोनी यांच्याआधी  पी. के. जोशी हे यूपीएससीचे अध्यक्ष होते. जोशी हे पूर्वी मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांच्याच कार्यकाळात व्यापम घोटाळा झाला होता. त्यानंतर ते यूपीएससीचे अध्यक्ष  झाले, त्यानंतर त्यांची नियुक्ती एनटीए (National Testing Agency) चे अध्यक्ष म्हणून झाली, जी नीट परीक्षा घेते. हे सगळे पाहता यूपीएससी आणि NEET घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहीजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारupscकेंद्रीय लोकसेवा आयोगCentral Governmentकेंद्र सरकार